JalgaonNews : एरंडोल तालुक्यात बंद पडलेला वसंत सहकारी साखर कारखाना, अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीमध्ये बुडित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन आदी मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दर तीन-चार वर्षांत हे मुद्दे चर्चेत येतात. नंतर लोकप्रतनिधींना त्याचा विसर पडतो. सत्तेसाठी अनेकांनी या प्रकल्पांचा उपयोग केल्याची टीका शेतकरी करू लागले आहेत. मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या प्रकल्पांची गावोगावी, चावड्यांवर चर्चा झाली. पण हे प्रश्न प्रलंबित आहेत. .तीस वर्षे वापरवनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखाना सुमारे तीस वर्षांपासून बंद आहे. १९९० पासून सर्वच निवडणुकीत उमेदवारांनी तो सुरू करण्याबाबत आश्वासने देऊन सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांची मते मिळवली, मात्र निवडणुका होताच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे..Anjani Water Project : ‘अंजनी’सह चारही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’.आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाली, की त्याकडे दुर्लक्ष करायचे, असा अनुभव तीस वर्षांपासून मतदारांना येत आहे. एरंडोल तालुक्यातील प्रमुख समस्यांकडे सर्वच सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. .आताचे पालकमंत्री लक्ष देतील का? एरंडोल क्षेत्राचे १९९९ मधील आमदार तथा विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वसंत कारखाना आणि अंजनी प्रकल्प या दोन प्रमुख समस्या प्राधान्याने सोडविण्याची घोषणा करून निवडणूक लढवली होती. पण पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्या कारकीर्दीत या दोन्ही समस्या सुटलेल्या नाहीत. अंजनी नदीच्या पात्रातून पाणी वाहून जाते. ते पूर्ण क्षमतेने अडविता येत नाही. .Girna Dam : गिरणा धरणाचे पाणी नदीजोडद्वारे अंजनी, भोकरबारीत.ठळक बाबी अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीनुसार काम पूर्ण झाले आहेपण वाढीव उंचित बुडित तीन गावांचे पुनर्वसन झालेले नाही.प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यास अडचण आहेपूर्ण क्षमतेने जलसाठा होऊन एरंडोल आणि धरणगाव तालुक्यांतील मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहेतीस वर्षांचा कालावधी उलटूनही तीन गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.