Cotton Market
Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market: कापसाचे भाव कोणकोणत्या देशात वाढले?

Team Agrowon

Cotton Bajarbhav : देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर दबावात होते. देशात तर मार्च महिन्यापासून कापूस बाजाराने मान टाकली. कापसाचे भाव वाढत नसल्यानं शेतकरी कापूस विकत आहेत. पण चालू आठवड्यात वायद्यांमध्ये सुधारणा दिसली. अमेरिका, भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये कापूस दरात काहीशी वाढ झाली होती.

अमेरिकेत चालू आठवड्यात कापूस वायद्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. कापसाचे वायदे मागील आठवड्यात ८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते या आठवड्यात ८४ सेंटवर पोचले. कापसाच्या वायद्यांमध्ये जवपास ५ टक्क्यांची वाढ झाली होती.

तर काॅटलूक ए इंडेक्स म्हणजेच जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव कायम होता. अमेरिकेच्या कापसाला चीनकडून उठाव मिळाल्यामुळं दरात सुधारणा झाल्याचं बाजारातील विश्लेषकांनी सांगितलं.

चीनमध्येही कापसाचे भाव चालू आठवड्यात वाढले. चीनमध्ये चालू आठवड्यात कापसाच्या भावात टनामागं ४४५ युआनची वाढ झाली. चीनमध्ये कापसाला आता १५ हजार ६५० युआनचा भाव मिळत आहे.

चीनमध्ये कापडाला उठाव मिळत असल्याचे वृत्त मागील दोन दिवसांपासून येत आहे. त्याचाच परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही दिसत असल्याचे सांगितले जाते. कापड आणि सूत तसचं कापसालाही उठाव मिळाल्यानं सुधारणा झाली.

ब्राझीलमध्ये मात्र कापूस दर दबावात राहीले. तर पाकिस्तानमध्ये दर स्थिर होते. यंदा पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे पाकिस्तानात कापसाचे भाव वाढले आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये कापसाला ३७ किलोसाठी २० हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

इतर देशांमध्ये कापसाच्या दरात चालू आठवड्यात वाढ झाली. मागणीमध्ये सुधारणा दिसत असल्याचे अहवाल पुढे आल्यानंतर दरात सुधारणा झाल्याचं बाजारातील विश्लेषक सांगत आहेत.

देशातील वायदेही सुधारले

भारतातही कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एमसीएक्सवर कापसाचे वायदे १८० रुपयांनी वाढले होते. वायदे ६३ हजार २६० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील वायदे बाजारावरही जाणवला. ही सुधारणा पुढील आठवड्यातही कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाजारातील स्थिती काय?

वायद्यांमध्ये कापूस सुधारल्याचा परिणाम काही बाजार समित्यांमध्येही दिसला. अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसली. पण कापसाच्या सरासरी दरपातळीत बदल दिसला नाही. कापसाची सरासरी दरपातळी आजही ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. यामुळं वायद्यांमधील सुधारणेचा परिणाम प्रत्यक्ष बाजारात कमीच दिसला.

राज्यनिहाय कापूस आवक

बाजारात कापसाची आवक आजही सरासरीपेक्षा पाच पटीने जास्त होती. बाजारात जवळपास एक लाख गाठी कापसाची आवक झाली होती. गुजरातमध्ये सर्वाधिक ३८ हजार गाठींची आवक झाली. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ३२ हजार गाठींची विक्री केली.

तेलंगणात ९ हजार तर उत्तर भारतात ६ हजार गाठी कापूस बाजारात आला. गेल्या हंगामाचा विचार केला तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाची रोजची सरासरी आवक २० हजार गाठींपेक्षाही कमी होती.

आवक कमी होईल का?

देशातील बाजारात कापसाची आवक जास्त असल्याचा दबाव दरावर येत आहे. पण ही परिस्थिती जास्त दिवस राहील असं वाटत नाही. कारण शेतकऱ्यांकडे आता कापसाचा स्टाॅक कमी आहे.

काही भागात शेतकऱ्यांकडे कापूस जास्त दिसत असला तरी सर्वच भागात ही परिस्थिती नाही. त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी होत जाईल. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन , हरभरा, तूरीचे काय आहेत दर ?

Agriculture Update : फळपिकांना बाल्यावस्थेत वळण देणे फायदेशीर

Agriculture Update : केवळ वाणच नाही, तर लागवड पद्धतही महत्त्वाची

Maharashtra Rain : पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढणार; राज्यभरात पुढील ५ दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Crop Advisory : आंबा, नारळ, सुपारी पीक सल्ला

SCROLL FOR NEXT