Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : पाकिस्तानमधील बाजारातील कापूस आवक ३४ टक्क्यांनी घटली

Team Agrowon

Cotton Rate Update : पाकिस्तानमधील महत्वाच्या कापूस उत्पादन (Cotton Production) सिंध आणि पंजाब राज्यांना यंदा पूर आणि पावसाचा मोठा फटका बसला होता. कापूस उत्पादनात घट झाल्यानं बाजारातील आवक कमी आहे.

ऑगस्ट ते मार्च या काळात पाकिस्तानमधील बाजारातील कापूस आवक गेल्यावर्षीपेक्षा ३४ टक्क्यांनी कमी झाली, असे पाकिस्तान काॅटन जिनर्स असोसिएशनने सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळं बाजारातील आवकही कमीच आहे. पाकिस्तानमध्ये पाऊस आणि पुरामुळे महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाचे मोठे नुकसान झाले.

परिणामी यंदा येथील उत्पादन निचांकी पातळीवर पोचले. पाकिस्तानचे पणन वर्ष ऑगस्ट ते जुलै असे असते. पण चालू हंगामात ऑगस्टपासून आतापर्यंत कापूस आवकेत ३४ टक्क्यांची घट आहे. याचा पाकिस्तानमधील कापड उद्योगावर मोठा परिणाम होत आहे.

पाकिस्तानमधील बाजारात ऑगस्ट ते मार्च या काळात ४९ लाख ५ हजार गाठी कापसाची आक झाली होती. तर मागील हंगामात याच काळातील आवक ७४ लाख ४२ हजार गाठींवर होती.

म्हणजेच यंदाची आवक २५ लाख ३६ हजार गाठींनी कमी आहे, असे पाकिस्तान काॅटन जिनर्स असोसिएशनने म्हटले आहे. फक्त मार्च महिन्यातील कापूस आवकेचा विचार केल्यास मोठी घट झाली. मार्च २०२३ मध्ये ३७ हजार गाठींची आवक झाली. जी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

पाकिस्तानमध्ये यंदा उत्पादन कमी झाले. कापूस आयातीसाठी विदेशी चलनाचा तुटवडाही आहे. तसेच कापडाला आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणीही कमी झाली. याचा परिणाम पाकिस्तानमधील कापड उद्योगावर होत आहे.

मागील तीन महिन्यांमधील बाजारातील कापूस आवक काहीशी अधिक दिसते. पण ऐन आवकेच्या हंगामातील आवक कमी होती. पाकिस्तानमधील कापूस आवकेचा कालावधी ऑगस्ट ते फेब्रुवारी समजला जातो. पण या काळातच आवक कमी होती.

पाकिस्तानमधील राज्यानिहाय कापूस आवकेचा विचार केल्यास पूरग्रस्त भागातील आवक मोठ्या प्रमाणात कमी दिसते. सिंध प्रांतात पुराचा सर्वाधिक फटका बसला. या प्रांतात कापूस आवक यंदा जवळपास ४७ टक्क्यांनी कमी आहे. सिंध मध्ये मार्चपर्यंत १८ लाख ७७ हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर गेल्यावर्षी याच काळातील आवक ३५ लाख गाठींवर होती.

पंजाब प्रांतातील आवकही यंदा २३ टक्क्यांनी कमी आहे. सिंधनंतर पंजाब प्रांत कापूस उत्पादनात महत्वाचे आहे. पण पंजाबलाही यंदा पूर आणि पावसाचा तडाखा बसला होता. यातून कापूस पीक सावरलेच नाही. पंजाबमध्ये मार्चपर्यंत ३० लाख २८ हजार गाठी कापूस आवक झाली होती. तर गेल्याहंगामातील याच काळातील आवक ३९ लाख २७ हजार गाठी होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पारोळा, अमळनेर, जामनेरात पाणी टंचाईची समस्या वाढली

Gadhinglaj Sugar Factory : 'गडहिंग्लज साखर कारखान्याची चौकशी करून प्रशासक नेमा'

Bharari Pathak : बियाणे, खते तपासणीसाठी १५ भरारी पथके

Onion Rate : मोदींना कांदा प्रश्नांवर बोलेन; छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन!

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचे वातावरण ; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज 

SCROLL FOR NEXT