Cotton
Cotton  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : उद्योगांचा कापूस वापर वाढला; आवकेचा दरावर दबाव

Anil Jadhao 

Cotton Rate : देशातील सूतगिरण्या आणि कापड उद्योग (Textile industry) जवळपास पूर्ण क्षमतेने सुरु आहे. उद्योगांचा कापूस वापरही उचांकी पातळीवर होत आहे. त्यातच देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज महिन्याला कमी होत आहेत.

तर दुसरीकडे मागील महिनाभरापासून कापसाचे भाव दबावात होते. पण कापूस उत्पादन (Cotton production) घटीचा अंदाज आल्यानंतर कापूस दरात काहीशी सुधारणा झाली.

तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील कापूस उत्पादन यंदा घटलं. मागील हंगामात शेतकऱ्यांना कापसाला जुलैनंतर १२ हजार ते १३ हजार रुपये भाव मिळाला होता. यंदाही हाच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन हंगामात कापसाची भाव कमी झाले होते.

नोव्हेंबर महिन्यात सरासरी ९ हजारांचा असणारा भाव डिसेंबरपासून ८ हजार ५०० रुपयांवर आला. त्यानंतर दरात काहीचे चढ उतार झाले. पण जानेवारीपासून कापूस दरातील नरमाई कायम आहे.

गेल्यावर्षीप्रमाणं कापसाचे भाव यंदा मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाच्या वेचण्याही कमी केल्या. परिणामी यंदा देशातील उत्पादन कमी राहिलं, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी सांगितलं.

देशातील सूतगिरण्या सध्या नफ्यात आहेत. पण कापसाचा तुटवडा जाणवत आहे. देशात सध्या कापसाचे तंत्रज्ञान जुनेच आहे. त्यामुळं उत्पादकता कमी आहे. अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियात आधुनिक तंत्रज्ञान असल्याने त्यांची उत्पादकता आपल्यापेक्षा दुप्पट आहे.

उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागे ठेवला. सध्या उत्तर भारतातील शेतकऱ्यांकडे २० ते २५ टक्के, गुजरात आणि महाराष्ट्रात ५० टक्के आणि दक्षिणेतील राज्यांमधील शेतकऱ्यांडे ३० ते ४० टक्के कापूस आहे, असे गणात्रा यांनी सांगितले.

देशातील सूतगिरण्या आता ९५ टक्के क्षमतेने सुरु असून महिन्याला २८ ते ३० लाख गाठी कापसाचा वापर होत आहे. उद्योगांना सध्या गरजेप्रमाणे कापूस मिळत आहे. एरवी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कापसाची विक्री करतात.

पण यंदा शेतकऱ्यांनी या दोन महिन्यांत कापासाची मर्यादीत विक्री केली. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापूस आवक वाढली. कापूस आवकेचा दबाव सध्या दरावर आहे.

कापूस दरात काहीशी सुधारणा

कापूस उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यानंतर कापूस दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. बाजारातील आकेचा दबाव पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे.

त्यानंतर मात्र आवक मर्यादीत राहून दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत १५५ लाख गाठी कापूस बाजारात आला. म्हणजेच शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस आहे. अनेक शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने पुढील काही महिने कापूस विकणार नाहीत. त्यामुळं उद्योगांना कापसाचा तुटवडा जाणवू शकतो.
अतूल गणात्रा, अध्यक्ष, काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT