Paddy Cultivation Agrowon
ॲग्रोमनी

Monsoon: मॉन्सूनच्या वाटचालीवर उद्योग क्षेत्राची नजर

शेती मूल्य साखळी क्षेत्रातील जाणकारांच्या मते रशिया- युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) जागतिक अन्न पुरवठा साखळी खंडित झाली.आता चीन आणि तैवानमधील तणाव (China-Taiwan conflict) वाढला आहे. त्यातच हवामानात टोकाचे बदल होत आहेत.

Team Agrowon

मॉन्सूनकडे जसे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, तसेच जगभरातील अनेक कंपन्यांही मॉन्सूनच्या वाटचालीवर लक्ष ठेऊन आहेत. मागच्या सहा-सात महिन्यांपासून शेतीमालाच्या किंमतींत चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे शेतीमाल उद्योग क्षेत्रातील कंपन्यांनी जगभरातील मॉन्सूनच्या वाटचालीवर बारीक नजर ठेवली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

शेती मूल्य साखळी क्षेत्रातील जाणकारांच्या मते रशिया- युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) जागतिक अन्न पुरवठा साखळी खंडित झाली. या दोन देशांमधून होणाऱ्या शेतीमालाच्या पुरवठ्यावर जगातील अनेक देश अवलंबून आहेत. त्या देशांमध्ये अन्नसंकट उद्भवले. त्यातच आता चीन आणि तैवानमधील तणाव (China-Taiwan conflict) वाढला आहे. त्यातच हवामानात टोकाचे बदल होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे शेतीमालाच्या दरात चढ-उतार होत आहेत.

शेतीमालाच्या किंमतींमध्ये यावर्षी सर्वाधिक लहरीपणा दिसून येत असल्याचे अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक अंगशु मलिक म्हणाले. विल्मर या आमच्या जागतिक पातळीवरील भागीदाराकडून मॉन्सूनच्या ट्रेंडचा अभ्यास केला जात आहे. कारण त्यावरच भारतातील शेतीमालाच्या किमती ठरणार असल्याचेही मलिक यांनी नमूद केले.

व्यापारी सूत्रांच्या मते, अमेरिकेतील काही भागांत ऑगस्ट महिन्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे तिथले सोयाबीनचे पीक गोत्यात येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीचे हवामानच सोयाबीनचे भवितव्य ठरवत असते. ऑगस्टमध्येच सोयाबीनच्या शेंगा भरत असतात, याकाळात पिकाला ठराविक अंतराने पावसाची गरज भासत असते. त्यामुळे या काळात हवामान प्रतिकूल राहिले तर साहजिकच उत्पादनावर परिणाम होतो.

सोयाबीन तेलाच्या उत्पादनातील घट खाद्यतेल (Edible Oil) उद्योग क्षेत्रासाठी मारक ठरू शकते. सोयातेलाच्या किंमती वाढल्या तर इतर खाद्यतेलांच्याही किंमती वाढतील. मलेशिया आणि इंडोनेशियाच्या पाम तेल निर्यातीवरील बंधने शिथिल केली आहेत. त्यामुळे सध्या भारतात खाद्यतेलाच्या किमती स्थिरावल्या आहेत.

रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मॉन्सूनच्या जगभरातील प्रवासावर नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र आता त्याचा नित्य आढावा घेणे अनिवार्य बनल्याचे जेमिनी एडिबलस अँड फॅट्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चौधरी म्हणाले.इटली आणि जॉर्डनमधील दुष्काळामुळे जागतिक बाजारातील भारतीय तांदळाच्या किमतीत वाढ झाली. कारण या दोन्ही देशांनी आता मोठ्या प्रमाणात भारताकडून तांदुळ घ्यायला सुरुवात केली.

भारतासोबतच जगभरातील कंपन्यांकडूनही भारतातील मॉन्सूनच्या वाटचालीवर नजर ठेवली जाते आहे. या खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत देशाच्या एकूण भात लागवड क्षेत्रात मागाच्या वर्षीपेक्षा १३.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार,झारखंड सारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही, त्यामुळे तिथे भात लागवड लांबणीवर पडली. अगदी ओडिशा, छत्तीसगड या राज्यांतही भात लागवड (Paddy Cultivation) क्षेत्रात मोठी घट झाली.

ओडिशात मागच्या वर्षी १ ऑगस्टपर्यंत २० लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती. यंदा केवळ १६ लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आल्याचे ओडिशाच्या कृषी विभागाने म्हटले.भारताच्या तांदूळ उत्पादनात (Rice Production) घट झाल्यास त्याचे पडसाद देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात उमटतील. जागतिक तांदूळ निर्यातीत (Rice Export) भारताचा वाटा तब्बल ४० टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : खत पुरवठा संकटावर केंद्रीय कृषिमंत्र्यांची चालाखी?

Maharashtra Recruitment Injustice : कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत प्राधान्य द्या

Fake GR : बनावट शासन निर्णयाद्वारे साडेपाच कोटींची कामे

Crop Insurance Maharashtra : पीकविम्याबाबत कृषिमंत्र्यांचा दावा फोल

Re-Sowing Crisis : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

SCROLL FOR NEXT