Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market: तुरीच्या बाजारावर सरकारचं बारीक लक्ष; दराची स्थिती काय?

पुढील वर्षात येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन सरकारने तुरीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाजारावर कडक नियंत्रण ठेवलं जातंय.

Anil Jadhao 

Tur Rate Update : पुढील वर्षात येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन सरकारने तुरीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाजारावर कडक नियंत्रण ठेवलं जातंय.

सरकारच्या धोरणामुळं व्यापारी, स्टाॅकीस्ट आणि प्रक्रियादार गरजेप्रमाणं तूर खरेदी करत आहेत. यामुळे तुरीच्या दरात काहीसे चढ उतार होत आहेत.

सध्या जगात महागाईचा फटका सर्वच देशांना बसत आहे. भारतात मागील हंगामात धान्याचे दर तेजीत होते. गहू, ज्वारी आणि बाजारी तसेच तांदळाचे दर वाढले होते. पण यंदा गहू आणि तांदळाचे भाव नरमले. ज्वारीही उचांकी दरावरून खाली आली.

त्यामुळं सरकारची चिंता काहीशी मिटली. पण सरकारची खरी चिंता आहे तुरीच्या दराविषयी. तुरीने मागील दोन महिन्यांपासून सरकारच्याही तोंडचं पाणी पळवलं.

सरकार अन्नधान्यसह खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षातील निवडणुकांच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. या आधी सरकार भाव कमी करण्यासाठी स्टाॅक लिमिट, साठ्याची माहीती, आयातवाढ आदी निर्णय घेते.

पण यंदा उत्पादनातील घट खूपच जास्त आहे. त्यामुळं सरकारने प्रयत्न करूनही दरातील तेजी कायम आहे.

सरकार तुरीच्याबाबतीत एवढं आक्रमक झालं की अगदी जिल्हा पातळीवरही त्याचा आढावा घेतला जातोय. जिल्हाधिकारी आपल्या क्षेत्रातील गोदामे, प्रक्रिया उद्योग आणि व्यापारी संस्थाकडे जाऊन पाहणी करून सहानिशा करत आहेत. कारण व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांनी दिलेली स्टाॅकची माहिती सरकारला अपुरी वाटते. सरकारच्या मते व्यापारी आणि आयातदार तुरीचा स्टाॅक करत आहेत.

सरकारच्या या भुमिकेमुळे व्यापारी आणि प्रक्रियादार गरजेप्रमाणं काम करत आहेत. डाळीला मागणी येते त्या प्रमाणात तुरीवर प्रक्रिया केली जात आहे. दुसरीकडे बाजारातील तूर आवकही कमी आहे. शेतकरी दरातील तेजी वाढण्याची वाट पाहत आहेत. यंदा तुरीला चांगला दर मिळू शकतो, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. त्यामुळं बाजारातील तूर आवक ऐन आवकेच्या हंगामातही कमीच दिसली. यामुळं आवकेचा दरावर परिणाम जाणवत नाही.

सध्या बाजारातील आवक मागणीपेक्षाही कमी आहे. प्रक्रिया उद्योगांनाच गरजेप्रमाण तूर मिळत नाही. तसचं तुरीची डाळही हातोहात विकली जात असल्याचं प्रक्रियादारांनी सांगितलं. परिणामी स्टाॅकिस्टना तूर मिळत नाही. पण सरकारच्या धोरणामुळं वाढीव दरात खरेदीचीही हिम्मत दाखवली जात नाही.

सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आयात तूरही ८ हजार ८०० रुपयांपेक्षा अधिक दरात मिळते. म्हणजेच देशात स्वस्त तूर आयात होण्याची शक्यता सध्यातरी नाही. तसचं बाजारात कमी आवक, वाढलेली मागणी आणि मर्यादीत आयात दिसते. त्यामुळं पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT