Coconut Oil
Coconut Oil Agrowon
ॲग्रोमनी

चीनकडून भारतीय नारळ तेलाच्या खरेदीची शक्यता

Team Agrowon

चीनने आजवर कधीही भारताकडून नारळ तेल (Coconut Oil) आयात केलेले नाही. सध्या भारतीय नारळ तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रमुख नारळ तेल उत्पादक देश असलेल्या फिलिपाईन्स आणि इंडोनेशियातील दरांशी स्पर्धा करत आहेत. चीन भारताकडून नारळ तेल आयात करण्याचा विचार करत असल्याची शक्यता या क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केली.

वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नारळ तेलाचे दर १७५८ डॉलर्स प्रति टन आहेत. या तुलनेत भारतीय नारळ तेलाचे (Coconut Oil) दर १९४७ डॉलर्स प्रति टन असे आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारातील नारळ तेलाचे दर १६३१ डॉलर्स प्रति टन होते. तर भारतीय नारळ तेलाचे (Coconut Oil) दर २५०२ डॉलर्स प्रति टन असे होते.

भारतातील नारळ तेल उत्पादक कंपन्यांनी चीनला नारळ तेल (Coconut Oil) निर्यात करण्याची तयारी केली असून निर्यातीपूर्वी त्यांना काही कठोर प्रक्रियात्मक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाने (Coconut Development Board) यासंदर्भात चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. नारळ तेल निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. चीनसोबतची संभाव्य व्यावसायिक संधी प्रत्यक्षात यायला काही काळ जावा लागेल, त्यामुळे याबाबत आताच भाष्य करणे चुकीचे ठरेल, असे सूत्रांनी नमूद केले आहे.

चीन हा नारळ तेलाचा मोठा आयातदार देश आहे. इंडोनेशिया, फिलिपाईन्स,श्रीलंका, मलेशिया हे देश चीनला नारळ तेलाचा पुरवठा करतात. चीनने आजवर भारताकडून नारळ तेल खरेदी केलेले नाही. भारताची चीनला नारळ तेल निर्यात करण्याची योजना प्रत्यक्षात आल्यास देशाच्या नारळ तेल उत्पादन क्षेत्राला दिलासा मिळेल. देशांतर्गत मागणी नसल्याने हे क्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

निर्यातीचे निकष पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने सहकार्य केले तर भारतीय नारळ तेलाला चीनच्या बाजारपेठेत मोठी संधी मिळू शकेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

भारताकडून सध्या अमेरीका, कॅनडा, इंग्लडला पॅकिंग केलेले आणि कच्चे नारळ तेल निर्यात केले जाते. चीनमध्ये नारळ तेल निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्यास नारळ तेल क्षेत्रासाठी तो दिलासा ठरेल. हा दिलासा भारत चीनला किती प्रमाणात निर्यात करणार? यावर अवलंबून असेल, असा कयास कोचीन ऑइल मर्चंट्स असोसिएशनचे संचालक टाळत महमूद यांनी व्यक्त केला आहे.

देशांतर्गत नारळ तेल उद्योगाला आधार देण्यासाठी भारतीय नारळ तेलाचे दर कमी झाले तरच निर्यातीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. पुरवठ्यातील मर्यादा कमी झाल्याने जागतिक स्तरावरील खाद्यतेलाच्या किमतीत घसरत आहेत. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारातील नारळ तेलाच्या दरांतही उमटतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT