Sugar Export
Sugar Export  Agrowon
ॲग्रोमनी

केंद्राकडून पुढच्या हंगामापर्यंत निर्यात मर्यादेचा पुनर्विचार नाही

Team Agrowon

पुढील हंगामापर्यंत सरकार १० दशलक्ष टन साखर निर्यातीच्या (Sugar Export) मर्यादेबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता नाही. सप्टेंबरपर्यंतच्या साखर उपलब्धतेचा विचार करून सरकारकडून मर्यादित प्रमाणात अतिरिक्त अशा कच्च्या साखरेच्या निर्यातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या हंगामाप्रमाणेच पुढच्या साखर हंगामातही साखरेचे वाढीव उत्पादन होईल, या गृहीतकाच्या आधारे साखर उद्योग क्षेत्राने सरकारकडे १ दशलक्ष टन अतिरिक्त साखरेच्या निर्यातीची परवानगी मागितलीय. बुधवारी (१५ जून) केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीतही साखर उद्योगाने सरकार अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी कधी देणार? या मागणीबाबत विचारणा केली. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

आजमितीस कारखान्यांकडे ०.६ ते ०.७ दशलक्ष टन कच्ची साखर उपलब्ध असल्याचे साखर उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी सांगितले. निर्यातीच्या हेतूने कारखान्यांकडून ती आधीच उत्पादित करण्यात आलेली आहे. कारखान्यांना त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रति किलो २ ते ३ रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाने कारखान्यांना त्यांच्याकडील कच्च्या साखरेची माहिती देण्याबाबत आवाहन केले. यावरून सरकारला एकूण साठ्याचा अंदाज घेता येणे शक्य होणार आहे. २०२२-२०२३ च्या हंगामातील साखर उत्पादनाबाबत (Sugar Production) सरकार आशावादी आहे.

साखर आयुक्तालयांनी दिलेली माहिती आणि साखर उद्योग क्षेत्रातील संघटनांनी वर्तवलेल्या विक्रमी अंदाजानंतरही केंद्र सरकारकडून सावध भूमिका घेतली जात आहे. साखर उत्पादक राज्यांसोबतची बैठक पार पडूनही सरकारने पुढच्या हंगामातील साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक केलेला नाही.

यावर्षी प्राथमिक अंदाजात ३० ते ३१ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला अन आता ३६ दशलक्ष टन आकडा समोर येतोय. उत्पादनाच्या अंदाजात एवढी तफावत कशी काय शक्य आहे? असा सवाल सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील साखर उत्पादन देशात अव्वल ठरेल,याचा अंदाज कोणालाच नव्हता. तर दुसरीकडे लागवड क्षेत्र जास्त असूनही उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनात घट झाली. त्यामुळे आताच पुढच्या हंगामातील उत्पादनाचा अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतातील ऊस लागवडीचे क्षेत्र यावर्षी २ टक्क्यांनी वाढले आहे. २ जूनपर्यंत ४६.६७ लाख हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४५.८१ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) सॅटेलाईट इमेजेसच्या आधारे जुलै महिन्यात पुढच्या हंगामाचा अंदाज प्रसारित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT