Basmati Rice Agrowon
ॲग्रोमनी

Basmati export : बासमती निर्यात दरात विक्रमी वाढ

चालू आर्थिक वर्षात या दोन महिन्यात भारताने बासमती निर्यातीच्या (Basmati Export) माध्यमातून ६९८ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. या दोन महिन्यात निर्यात केलेल्या बासमतीला प्रति टन १ हजार डॉलर्सचा दर मिळाला असून हा मागच्या सहा वर्षातला सर्वोच्च दर ठरला.

Team Agrowon

रशिया- युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) जगभरातील कमोडिटीजच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे साहजिकच भारताच्या बासमती (Basmati Rice) निर्यातीच्या किमतीतही वाढ झाली. याचा परिणाम म्हणून एप्रिल ते मे दरम्यान भारताने निर्यात केलेल्या बासमतीचे (Basmati Export) मूल्य १३ टक्क्यांनी वाढले. चालू आर्थिक वर्षात या दोन महिन्यात भारताने बासमती निर्यातीच्या माध्यमातून ६९८ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. या दोन महिन्यात निर्यात केलेल्या बासमतीला प्रति टन १ हजार डॉलर्सचा दर मिळाला असून हा मागच्या सहा वर्षातला सर्वोच्च दर ठरला.

या दोन महिन्यात बासमती तांदळाच्या (Basmati Rice Export)निर्यातीचे प्रमाण तुलनेने कमी होते. बासमती निर्यात दरातील तेजी सप्टेंबरपर्यंत कायम राहील, असा व्यापारी सूत्रांचा कयास आहे. बासमतीच्या नव्या उत्पादनाचे संकेत मिळेपर्यंत ही तेजी कायम राहील, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.

बासमती निर्यातीच्या प्रति युनिट दरात २० टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. एप्रिल- मे दरम्यान १०१९ डॉलर प्रति टन दराने बासमतीची निर्यात (Basmati Export) झाली. वर्षभरापूर्वी याच काळात प्रति ८४६ डॉलर प्रति टन दराने बासमती निर्यात करण्यात आली होती. मात्र यावर्षी निर्यातीचे प्रमाण ६ टक्क्याने (६.८६ लाख टन) घटले.

चालू विपणन वर्षाच्या (ऑक्टोबर ते सप्टेंबर) सुरुवातीला बासमतीच्या मागणीत (Basmati Demand)वाढ दिसून आली. त्यानंतर बासमती निर्यातीसाठीच्या किमतीत वाढ झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये निर्यातीसाठीची किंमत प्रति टन ८९० डॉलर होती. मे २०२२ला ती प्रति टन १०२१ डॉलरवर पोहचली. ( सात महिन्यांत १५ टक्क्यांची वाढ) गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये निर्यातीसाठीची किंमत प्रति टन ८०५ डॉलर होती. मे २०२१ मध्ये ही किंमत प्रति टन ८४२ डॉलरवर पोहचली.

गेल्यावर्षी बासमतीच्या 'पुसा ११२१' आणि 'पुसा १५०९' या वाणांच्या उत्पादनात घट झाली होती. निर्यातीत या दोन्ही वाणांचा वाटा मोठा असतो. उत्पादनात घट झाल्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने निर्यातदारांनी विक्रीचे प्रमाण कमी केले.

सध्या बासमतीचे पुसा ११५१ हे वाण ४० हजार रुपये प्रति टन विकल्या जात आहे, हा बासमतीचा विक्रमी दर आहे. पुढचे पीक हाती येईपर्यंत विक्रीचा हा ट्रेंड पुढची दोन महिने तसाच राहील, अशी शक्यता ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (All India Rice Exporters Association) अध्यक्ष विजय सेठिया यांनी व्यक्त केली.

मागच्या दोन महिन्यात भारताने इराणसोबत २ ते २.५ लाख टन बासमती निर्यातीचे करार केले आहेत. अगदी देशांतर्गत बाजारातही ४० रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा बासमती तांदूळ (Basmati Rice) ६० रुपये प्रति किलो दराने विकला जाण्याची शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

सरकारी माहितीनुसार, २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भारताने बासमती तांदळाच्या निर्यातीमधून ४.०२ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. त्या तुलनेत मागच्या आर्थिक वर्षात (२०२१-२०२२) निर्यातीत १२ टक्क्यांची घट झाली असून भारताने बासमती निर्यातीतून (Basmati Export) ३.५४ अब्ज डॉलर्सची कमाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता

Sericulture : दराच्या तेजीने रेशीम कोष उत्पादकांमध्ये उत्साह

Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी केवळ आठ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

Custard Apple Cultivation : अकोला देव येथे सीताफळ लागवडीचा प्रारंभ

Vegetable Market : नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT