Free Electricity
Free ElectricityAgrowon

Free Electricity: पंजाबात ३०० नव्हे,६०० युनिट्स मोफत वीज

आम आदमी पक्षाने (AAP) विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील नागरिकांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३०० युनिट्स वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्षात दरमहा ३०० ऐवजी ६०० युनिटपर्यंत मोफत वीज (Free Electricity) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on

(वृत्तसंस्था)

चंदीगड : पंजाब सरकारने मोफत विजेबाबत (Free Electricity) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दरमहा ३०० युनिट नव्हे तर, ६०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंजाबमध्ये एकहाती सत्तास्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाने (AAP) विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील नागरिकांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३०० युनिट्स वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होते. मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्षात दरमहा ३०० ऐवजी ६०० युनिटपर्यंत मोफत वीज (Free Electricity) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Free Electricity
Punjab Politics: पंजाबमध्ये या महिन्यापासून ३०० युनिट मोफत वीज

मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये पंजाबच्या जनतेला दिलेल्या मोफत विजेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार पंजाबमधील नागरिकांना प्रत्येक महिन्याला ६०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले असल्याचेही मान म्हणाले.

आम आदमी पक्षाच्या (AAP) मोफत विजेच्या घोषणेनंतर बराच गदारोळ झाला होता. मात्र, आता यावर शिक्कमोर्तब झाले आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal ) यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला दरमहा २०० युनिट मोफत वीज देते. आता पंजाबमध्येही मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपच्या या मोफत वीज (Free Electricity) घोषणेची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे वीज सवलतीसाठीच्या खर्चाचा एकूण आकडा ६९४७ कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. राज्यभरात ७३ लाख ८० हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यातील सुमारे ६० लाख घरगुती वीज ग्राहकांचा दरमहा विजेचा वापर ३०० युनिट्सपेक्षा कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com