मूग, उडिद डाळ
मूग, उडिद डाळ 
ॲग्रोमनी

देयके दिलेल्या मूग, उडीदडाळ आयातीला परवानगी

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे तुरीसह इतर कडधान्यांचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर मर्यादा घातल्या होत्या; मात्र ज्या व्यापाऱ्यांनी २१ आॅगस्टच्या आधी मूग व उडीदडाळ आयातीसाठी देयके दिली असतील त्यांना वार्षिक ३ लाख टन मर्यादेपेक्षा जास्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. मूग आणि उडीदडाळ अायातीने आधीच ३ लाख टनांची मार्यादा गाठली आहे. त्यामुळे देयके दिलेल्या परंतु डाळ आयात केली नाही अशा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशा व्यापाऱ्यांना त्यांची डाळ आयातीसाठी विदेशी व्यापार महासंचालकांच्या विभागीय कार्यालयात ३१ आॅक्टोबरपूर्वी नोंदणी करण्यास शासनाने सांगितले आहे. नोंदणी करतेवेळी व्यापाऱ्यांना खरेदी पावत्या व विहित वेळेत देयके दिल्याचे बॅंकेचे प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे.  हंगाम २०१६-१७ मध्ये चांगला पाऊस व पोषक वातावरणामुळे देशात कडधान्यांचा पेरा वाढला होता. त्यातच पोषक वातावरणामुळे बंपर उत्पादन झाले होते. सरकारने खेरदी सुरू केली; परंतु आयात होत असलेल्या डाळी आणि खरेदी यंत्रणेतील अडचणी यामुळे पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. त्यामुळे बाजारपेठेत कडधान्यांची आवक वाढल्यानंतर दर प्रचंड प्रमाणात पडले होते. त्यामुळे केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर निर्बंध घातले होते.    नोंदणी आवश्यक  मूग व उडीदडाळ आयातीसाठी २१ आॅगस्टपूर्वी देयके दिलेल्या; परंतु डाळ आयात न केलेल्या व्यापाऱ्यांना शासनाने ३ लाख टन मर्यादा पूर्ण होऊनही आयातीला परवानगी दिली आहे; मात्र त्यासाठी त्यांना विदेशी व्यापार महासंचालकांच्या विभागीय कार्यालयात ३१ आॅक्टोबरपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी २१ आॅगस्टपूर्वीच्या खरेदी पावत्या व देयके दिल्याचे बॅंकेचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. नाफेडकडून खरेदीस प्रारंभ खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मूग आणि उडदाला हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडने खरेदी सुरू केली होती. नाफेडने मंगळवार (ता. २४)पर्यंत मुगाची ३३ हजार ९७६ टन आणि उडदाची १२ हजार ८५९ टन खेरदी केली आहे, अशी माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. नाफेड राजस्थान, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्रात किमान आधारभूत किमतीने कडधन्यांची खरेदी करत आहे. यंदा उडदाला बोनससह ५ हजार ४०० तर मुगाला बोनससह ५ हजार ५७५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक २१ हजार ९८९ टन मूग आणि ९ हजार ६८८ टन उडदाची खेरदी राजस्थानमध्ये झाली आहे. खरिपातील नवीन उडदाची आवक सुरू होताच बाजारातील आवक वाढली आणि व्यापाऱ्यांकडून कमी खरेदी सुरू असल्याने दर हमीभावाच्या खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी नाफेड खरेदीत उतरले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT