संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
ॲग्रोमनी

हरभऱ्याच्या हमीभावात ३७५ रुपये वाढीची शिफारस

कोजेन्सिस वृत्तसेवा
नवी दिल्ली ः अागामी अार्थिक वर्षासाठी हरभऱ्याच्या किमान अाधारभूत किमतीत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३७५ रुपयांनी वाढ करण्याची शिफारस कृषी मूल्य अायागाने केंद्राकडे केली अाहे. सध्या हरभऱ्याची एमएसपी प्रतिक्विंटल ३,८०० रुपये अाणि त्यावर २०० रुपये अशी अाहे.
 
हरभऱ्यासह मोहरीच्या एमएसपीत प्रतिक्विंटल २५० रुपयांनी वाढ करण्याचीही शिफारस केली अाहे. सध्या मोहरीची एमएसपी प्रतिक्विंटल ३,६०० रुपये अाणि त्यावर १०० रुपये अशी अाहे. दरम्यान, कृषी मंत्रालयाने हरभरा अाणि मोहरीच्या एमएसपी वाढीबाबत काही सूचना केलेल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
रब्बी हंगामातील एकूण कडधान्य उत्पादनात हरभऱ्याचा ४० टक्के वाटा अाहे. तर तेलबिया उत्पादनात मोहरीचा वाटा २० टक्के अाहे. गेल्या काही वर्षांत कडधान्ये अाणि खाद्यतेलाच्या देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी अायात करावी लागत अाहे. त्यासाठी कडधान्ये अाणि तेलबियांच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन दिले जात अाहे. 
गव्हाच्या एमएसपीत १०० रुपये वाढीचा प्रस्ताव
२०१८-१९ (एप्रिल-मार्च)मधील हंगामासाठी कृषी मूल्य अायागाने गव्हाच्या अाधारभूत किमतीत १०० रुपयांनी वाढ करण्याची शिफारस केंद्राकडे केली अाहे. याला केंद्राने मान्यता दिल्यास गव्हाची अाधारभूत किंमत १,७२५ रुपयांवर पोचणार अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT