budget
budget  
ॲग्रोमनी

राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी

टीम अॅग्रोवन

कृषी

  •   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी २०१९-२० आणि २०२०-२१ वर्षासाठी २२ हजार कोटींची तरतूद
  •   शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरल्यास दोन लाख रुपये शासन देणार
  •   नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार देणार, रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास प्रत्यक्ष रकमेएवढा निधी देणार
  •   पीक विमा योजनेसाठी २ हजार ३३ कोटींची तरतूद
  •   अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी १० हजार कोटींचा निधी देणार
  •   शेतीपंपासाठी नविन वीजजोडण्या देण्यासाठी आशियाई विकास बॅंकेच्या सहकार्यातून योजना राबविणार
  •   शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षात ५ लाख सौरपंप देणार. नवीन योजनेत १० हजार कोटींचा कार्यक्रम राबविणार. सौरपंपासाठी २०२०-२१ मध्ये ६७० कोटींची तरतूद
  •   कृषी विभागासाठी ३२५ कोटींची तरतूद
  •   सरकार विभागासाठी ७९९५ कोटींची तरतूद
  • पायाभूत सुविधा

  •   कोकण सागरी महामार्गासाठी ३५०० कोटी रुपयांची तरतूद
  •   पुणे रिंगरोडसाठी १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित
  •   समृद्धी महामार्गासाठी ८ हजार ५०० कोटी उपलब्ध करून दिल्याने व्याज खर्चात बचत
  •   ग्रामीण सडक विकास योजनेंतर्गत ४० हजार कि.मी. रस्त्यांचे बांधकाम
  •   नागरी सडक विकास योजनेसाठी एक हजार कोटींची तरतूद
  •   पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी १ हजार ६५६ कोटींची तरतूद
  •   एसटीला बस खरेदीसाठी ५०० कोटी देणार, सध्या २०० कोटींची तरतूद 
  •   बस स्थानके अत्याधुनिक करण्यासाठी २०० कोटी
  •   सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतींचा विकास करण्यासाठी ४ हजार कोटी
  • आरोग्य

  •    ५०० रुग्णवाहिका खरेदीसाठी ८७ कोटी उपलब्ध, त्यापैकी २५ कोटींची तरतूद
  •   आरोग्यसेवेसाठी ५ हजार कोटी
  •   वैद्यकीय शिक्षणासाठी २ हजार ५०० कोटी बाह्य साहाय्यित प्रकल्प
  •   नंदुरबार, सातारा, अलिबाग आणि अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार
  •   महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत एकंदर ९९६ उपचार प्रकारांचा समावेश
  •   प्राधिकृत रुग्णालयांची संख्या ४९६ वरून एक हजारावर
  •   सार्वजनिक आरोग्य विभागासाठी २ हजार ४५६ कोटी रुपये 
  •   वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी ९५० कोटी
  • शिक्षण

  •   राज्यातील १५०० आदर्श शाळा घडविण्यासाठी ५०० कोटी बाह्य साहाय्यित अर्थसाहाय्याद्वारे खर्च करणार
  •   रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ११ कोटी 
  •   तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा एक कोटीवरून पाच कोटी, जिल्हा क्रीडा संकुलाची मर्यादा आठ कोटीवरून १५ कोटी आणि विभागीय क्रीडा संकुलाची मर्यादा २४ कोटींवरून ५० कोटी करण्यात आली
  •   शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करणार
  •   शिक्षण विभागासाठी २ हजार ५२५ कोटी
  •   उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी १३०० कोटी
  • महिला विकास व सुरक्षा

  •   राज्यात प्रथमच महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल अर्थसंकल्प सादर करणार
  •   विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय स्थापन करणार
  •   प्रत्येक जिल्ह्यात सर्व महिला अधिकारी, कर्मचारी असणाऱ्या किमान एका महिला पोलिस ठाण्याची स्थापना करणार
  • इमारत बांधकामे 
  •   मुंबई येथे मराठी भाषा भवन बांधण्याचे प्रस्तावित
  •   मुंबई येथे वस्तू व सेवाकर भवन बांधकामासाठी ११८.१६ कोटी खर्च प्रस्तावित
  •   नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचे प्रस्तावित
  •   न्यायालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्याकरिता ९११ कोटी 
  • पर्यावरण व वने

  •   जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलावर उपाययोजना राबविण्याठी विशेष निधीची तरतूद
  •   नदी कृती आराखडा
  •   पर्यावरण विभागासाठी २३० कोटी खर्च प्रस्तावित
  •   वन विभागाकरिता १ हजार ६३० कोटी खर्च प्रस्तावित
  • पर्यटन विकास

  •   मुंबईतील विविध पर्यटन विकासकामांसाठी १०० कोटी 
  •   वरळी येथील दुग्ध शाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन संकुलासाठी एक हजार कोटी
  •   पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागासाठी एक हजार ४०० कोटी खर्च प्रस्तावित
  •   आमदार स्थानिक निधीमध्ये २ कोटीवरून ३ कोटींपर्यंत वाढ
  •   पाचगणी-महाबळेश्‍वर विकास आराखड्यासाठी १०० कोटी खर्च प्रस्तावित
  •   नियोजन विभागास कार्यक्रमावरील खर्चासाठी ४ हजार २५७ कोटी खर्च प्रस्तावित
  •   सर्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू
  •   माहूरगड (जि. नांदेड), परळी बैजनाथ आणि औंढा नागनाथ (जि. हिंगोली), नर्सी नामदेव (जि. हिंगोली), पाथरी (जि. परभणी), प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ, हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा, मिरज या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता निधी देणार
  •   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीकरिता २५ कोटी खर्च प्रस्तावित
  •   महाराष्ट्र राज्याच्या हीरकमहोत्सवासाठी ५५ कोटी खर्च प्रस्तावित
  •   अखिल भारतीय नाट्यसंमेलनाकरिता १० कोटी अनुदान
  • सामाजिक सेवा

  •   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यासन सुरू करणार
  •   नोकरी करणाऱ्या महिलांसाठी पुणे येथे एक हजार निवासी क्षमतेचे वसतिगृह बांधणार
  •   मुंबई, पुणे विद्यापीठात मागासवर्गीय मुला, मुलींसाठी ५०० निवासी क्षमतेची वसतिगृहे
  •   सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकरिता ९ हजार ६६८ कोटी खर्च प्रस्तावित
  •   तृतीय पंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यासाठी ५ कोटी खर्च प्रस्तावित
  •   गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळास निधी उपलब्ध करून देणार
  •   आदिवासी विकास विभागासाठी ८ हजार ८५३ कोटी खर्च प्रस्तावित
  •   अल्पसंख्याक विभागासाठी ५५० कोटी खर्च प्रस्तावित
  •   इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागासाठी ३ हजार कोटी खर्च प्रस्तावित
  •   जिल्हा वार्षिक योजनेसाठी ९ हजार ८०० कोटी
  •   जिल्हा वार्षिक योजनेतील ३ टक्क्यांपर्यंतचा निधी पोलिसांच्या वाहनाकरिता राखीव
  •   शासकीय शाळा खोल्या दुरुस्ती व अंगणवाडी बांधकामासाठी विविध योजनांमधून निधी देणार
  •   वार्षिक योजनेसाठी एक लाख १५ हजार कोटी 
  •   अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ९ हजार ६६८ कोटी
  •   आदिवासी विकास उपाययोजनेसाठी ८ हजार ८५३ कोटी
  • इतर

  •   मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीच्या वेळी भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात व इतर भारांमध्ये पुढील दोन वर्षांच्या कालावधीकरिता १ टक्के सवलत
  •   औद्योगिक वापरातील वीज शुल्क सध्याच्या ९.३ टक्यांवरून ७.५ टक्के करण्यात येईल
  •   पेट्रोल व डिझेलच्या विक्रीवरील कराव्यतिरिक्त अतिरिक्त प्रतिलिटर १ रुपये करवाढ
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT