पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक खरेदी
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक खरेदी 
ॲग्रोमनी

पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक खरेदी

वृत्तसेवा

चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आत्तापर्यंत (ता.५) १२१.६४ लाख टन गव्हाची हमीभावाने शासकीय खरेदी करण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रवक्त्याने दिली. यात सरकारी संस्थांकडून १२१.१५ लाख टन आणि खासगी व्यापाऱ्यांकडून ४९१५७ टन पुनर्खरेदी करण्यात अाली असून एकूण खरेदीपैकी ९७.६० लाख टन गहू मंडींमधून उचलण्यात आला अाहे.  संगूर जिल्ह्यात एकूण १०.९६ लाट न खरेदी झाली असून, या पाठोपाठ पतियाळा ८.९३ लाख टन, भटिंडा ८.८७ लाख टन येथे सर्वाधिक शासकीय खरेदी झाली आहे. शासकीय संस्थांनुसार पुणग्रेन (पंजाब ग्रेन) ने २८ लाख ३ हजार ३५७ टन (एकूण खरेदीच्या २३ टक्के) खरेदी केली आहे. मार्कफेडने २६ लाख ६७ हजार ९६२ टन (२१.९ टक्के), पुणसूपकडून २३ लाख ४१ हजार ६१३ टक्के (१९.३ टक्के), पंजाब राज्य वखार महामंडळाकडून १६ लाख ५५ हजार ३०५ टन (१३.६ टक्के), पंजाब कृषी-अन्न महामंडळाकडून १२ लाख ७ हजार ३९० टन (९.९ टक्के), एफसीआय १४ लाख ३८ हजार ८९७ टन (११.८ टक्के) गहू खरेदी करण्यात अाली अाहे. तर खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण खरेदीच्या ०.४ टक्के (४९ हजार १५७ टन) खरेदी करण्यात अाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हरियाणात मोहरीची खरेदी हरियाणात राज्य सहकारी पुरवठा आणि पणन महामंडळाकडून आत्तापर्यंत १.७७ लाख टन मोहरीची हमीभावाने खरेदी करण्यात अाली आहे. या खरेदीचा ९१ लाख ७१९ शेतकऱ्यांना थेट लाभ झाला अाहे. महामंडळाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भिवानी जिल्ह्यात ३९ हजार ७३८.५० टन, खार्की दादरीत ८२७५.६० टन, फतेहबाद येथे ४५५७.६० टन, गुडगाव येथे ११ हजार ४७२.७७ लाख टन, नूह येथे १३६८.५६ टन, हिसार येथे १९,३२८ टन, जिंद १०७४.१० टन, जाजर येथे १७ हजार २५६.६० टन, कर्नाल येथे १७३.३० टन, महेंद्रगड येथे २३ हजार ४१७.७४ टन, रेवारी येथे २१ हजार २१२.६० टन, रोहतक येथे १० हजार ८.६० टन आणि सिरसा येथे १९ हजार १८१ .६० टन मोहरीची शासकीय खरेदी करण्यात                             आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT