Agricultural Credit Agrowon
ॲग्रोमनी

पीककर्ज उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या बँकांवर कारवाई; वडेट्टीवार यांचा इशारा

यावर्षी जिल्ह्यात सुमारे ७७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल. यासाठी एकूण हवामान, पावसाचा अंदाज, परिसरातील हवामानबाबत शेतकऱ्यांना कसा सल्ला देता येईल, यासाठी योग्य नियोजन करावे. दुबार पेरणीची शक्यता लक्षात घेऊन बियाण्यांचा व खतांचा साठा वाढविण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवावी.

Team Agrowon

चंद्रपूर : राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत नाहीत, ही गंभीर बाब आहे. या वर्षी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, तर संबंधित बँकांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

नियोजन भवन येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, रब्बी हंगामात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीचा पेरा वाढवा. यापुढे खरीप हंगामाप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगामपूर्व आढावा घेतला जाईल. बोगस खतामुळे शेती उद्ध्वस्त होते. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. त्याच्या वाहतुकीवर, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कृषी विभागाने अतिशय दक्षपणे काम करावे. हळद हे नगदी पीक आहे. भद्रावती, वरोरा व चिमूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. या पिकाच्या क्षेत्रवाढीकरीता क्लस्टर उभारण्यात येईल. याचा फायदा ब्रँडिंग व प्रोसेसिंगसाठी होईल.

वडेट्टीवार म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात सुमारे ७७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल. यासाठी एकूण हवामान, पावसाचा अंदाज, परिसरातील हवामानबाबत शेतकऱ्यांना कसा सल्ला देता येईल, यासाठी योग्य नियोजन करावे. दुबार पेरणीची शक्यता लक्षात घेऊन बियाण्यांचा व खतांचा साठा वाढविण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवावी. चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, नागभीड व वरोरा हे करडई उत्पादन करणारे तालुके आहेत. करडईचा पेरा वाढविण्यासोबतच त्याचे ब्रँडिंग व प्रोसेसिंग करण्यावर भर द्यावा. प्रायोगिक तत्त्वावर करडई पिकाचे जास्त उत्पादन करणाऱ्या तालुक्यात युनिट उभारता येईल. यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT