Soybean Sowing: Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Sowing: सोयाबीनची ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली

Soybean Rate : जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन उत्पादक आणि निर्यातदार अमेरिकेत पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे. अमेरिकेत सोयाबीनचा पेरा ९१ टक्क्यांवर पोचला आहे.

Team Agrowon

Soybean Market : जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन उत्पादक आणि निर्यातदार अमेरिकेत पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे. अमेरिकेत सोयाबीनचा पेरा ९१ टक्क्यांवर पोचला आहे. तर यंदा पेरणीची गती चांगली असल्याचे येथील कृषी विभागाने सांगितले.

अमेरिकेत यंदा सोयाबीनचा पेरा काहीसा वाढण्याचा अंदाज आहे. येथील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनचा पेरा वाढवत असल्याचे सांगितले होते. यंदा अमेरिकेत ८७५ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत जवळपास ७५० लाख हेक्टरवर लागवड पूर्ण झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेत ९१ टक्के सोयाबीन लागवड पूर्ण झाली. एरवी या काळात ७६ टक्यांपर्यंत पेरणी होत असते. तर मागील पाच वर्षांत या काळात झालेल्या पेरणीची सरासरी ५६ टक्के आहे. यंदा सोयाबीन पेरणीसाठी पोषक हवामान होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच गती वाढवली. परिणामी पिकाची स्थितीही चांगली आहे. अमेरिकेत उगवून आलेल्या पिकाची परिस्थितीही चांगली दिसते. सध्या ६१ टक्के पीक उत्तम अवस्थेत आहे. तर ३१ टक्के पीक बऱ्या स्थितीत आहे.

मका लागवडही अंतिम टप्प्यात आली आहे. मक्याची ९६ टक्के पेरणी झाल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने स्पष्ट केले. पिकाच्या स्थितीचा विचार करता ६४ टक्के पीक उत्तम आहे.

तर ५ टक्के पिकाची स्थिती चांगली नाही. तसेच ८१ टक्के गहू पिकाची लागवड पूर्ण झाली. कापूस पिकाची लागवडही ७१ टक्क्यांवर पोचल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

जागतिक बाजाराचे लक्ष

अमेरिकेतील सोयाबीन पेरणीकडे जागतिक बाजाराचं लक्ष आहे. यापुढील काळात अमेरिकेचे सोयाबीन पहिल्यांदा बाजारात येईल. त्यानंतर भारताचा हंगाम सुरु होतो. यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले. त्याचा दबाव जागतिक बाजारावर येत आहे.

त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन पिकाची स्थिती कशी राहते आणि उत्पादन किती होते? याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कोथिंबीरचा भाव टिकून, सोयाबीनचा भाव दबावातच, केळीची आवक टिकून, बाजरी नरमली तर काकडीला उठाव

Cloudy Weather : पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका

India Rice Exports: भारताची २६ देशांत तांदूळ निर्यातीची तयारी, २५ हजार कोटींचे करार शक्य, काय आहे योजना?

Labor Shortage : मजूर टंचाईपुढे शेतकरी हतबल

Monsoon Rain: राज्यात वादळी पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT