Soybean Import : मे महिन्यात चीनकडून विक्रमी सोयाबीन आयात

Soybean Market : जागतिक सोयाबीन बाजारात चीनचा दबदबा आहे. चीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आयात करत असतो.
Soybean Import
Soybean ImportAgrowon

China Soybean Update : जागतिक सोयाबीन बाजारात चीनचा दबदबा आहे. चीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आयात करत असतो. मे महिन्यात चीनने १२० लाख टन सोयाबीनची आयात केली.

मागीवर्षीच्या मे महिन्यात चीनची सोयाबीन आयातीपेक्षा यंदा २४ टक्क्यांची वाढ झाली, असे चीनच्या कस्टम विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.

चीन जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा ग्राहक आहे. चीनची मागणी कमी जास्त झाल्याचा परिणाम लगेच जावणतो. चीन वर्षाला ९०० ते ९५० लाख टन सोयाबीनची आयात करत असतो. चीनला सोयाबीन पुरवठादार म्हणझेच ब्राझील.

सहा वर्षांपूर्वी चीन अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करत होता. पण दोन्ही देशांमध्ये व्यापरयुध्द सुरु झाले आणि चीनने आपला मोर्चा ब्राझीलकडे वळवला. चीनची मागणी वाढत गेल्याने ब्राझीलमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली.

Soybean Import
Soybean Market Update : सोयाबीन बाजारावर सतत दबाव का येतोय?

चालू २०२३ या वर्षात ब्राझीलची सोयाबीन आयात मे महिन्यातच सर्वाधिक झाली. पहिल्या चार महिन्यांमध्ये चीनला आयातीत अडथले आले होते. पण मे महिन्यात हे अडथळे दूर झाले. त्यामुळे चीनला मे महिन्यात १२० लाख टन सोयाबीन आयात करता आली.

एप्रिल महिन्यातील आयात जवळपास ७३ लाख टनांवर होती. तर जून २०२० मध्ये एका महिन्यातील सर्वाधिक ११२ लाख टनांची आयात झाली होती. पण यंदाच्या मे महिन्यात हा विक्रम मोडला.

यंदा चीनचा मुख्य पुरवठादार असलेल्या ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणीला उशीर झाला. त्यातच कार्गोजच्या विलंबामुळे आयातीत अडचणी होत्या. मागील महिन्यात सोयाबीन आवक जास्त झाल्याने सोयापेंडच्या दारवरही परिणाम झाला.

मे महिन्यात चीनमध्ये सोयापेंडचे भाव ५१५ डाॅलर प्रतिटन होते. चीनमध्ये सोयाबीनला मागणी वाढत आहे. त्यामुले जूनमधील आयात १३० लाख टनांवर पोचू शकते, असा अंदाज चीनमधील व्यापारी व्यक्त करत आहेत.

पाच महिन्यातील आयात ११ टक्क्यांनी वाढली

चालू वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन आयात वाढली आहे. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी २०२३ ते मे २०२३ या काळात सोयाबीन आयात ११ टक्क्यांनी वाढली. या पाच महिन्यांमध्ये सोयाबीन आयात ४२३ लाख टनांवर पोचली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com