Soybean Market agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : ब्राझीलमध्ये सोयाबीनची ७६ टक्के काढणी पूर्ण

ब्राझीलचे उत्पादन वाढल्याने चीनसह महत्वाचे खरेदीदार देशांनी सोयाबीनसाठी ब्राझीलकडे मोर्चा वळवला.

Team Agrowon

Soybean Rate Update : ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणीने (Soybean Harvesting) आता वेग घेतला. सोयाबीन काढणीची गती मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे निर्यातही धीम्या गतीने होते आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत सोयाबीनची ७६ टक्के काढणी पूर्ण झाली. तर गेल्यावर्षी ब्राजीलच्या सोयाबीनचा चीन सर्वात मोठा ग्राहक ठरला.

ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) वाढ झाली. ब्राझीलचे उत्पादन यंदा १ हजार ५३० टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन काही प्रमाणात घटले. तर अर्जेंटीनातील उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीनला मागणी आहे.

ब्राझीलमध्ये मागील कही वर्षांमध्ये सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. ब्राझीलने सोयाबीन उत्पादनात अमेरिकेला मागे टाकत पहिल्या क्रमांक पटकावला आहे.

ब्राझीलचे उत्पादन वाढल्याने चीनसह महत्वाचे खरेदीदार देशांनी सोयाबीनसाठी ब्राझीलकडे मोर्चा वळवला. चीन मागील काही वर्षांपासून ब्राझीलकडूनच जास्त सोयाबीन आयात करत आहे.

मागीलवर्षी ब्राझीलच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ७० टक्के सोयाबीन एकट्या चीनने खरेदी केले होते. २०२२ मध्ये ब्राझीलने चीनला केलेल्या एकूण निर्यातीपैकी सोयाबीनचा वाटा सर्वाधिक होता. मागील दशकाचा विचार करता ब्राझीलची चीनला होणारी सोयाबीन निर्यात दुप्पट झाली.

चीन हा अमेरिकेच्या सोयाबीनचा पारंपरिक ग्राहक होता. मात्र मागील काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापार युध्द सुरू आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनने पर्यायी ब्राझीलकडून सोयाबीन आयात वाढवली. चीनच्या मागणीचा आधार मिळाल्याने ब्राझीलमध्ये सोयाबीनचा विस्तार होण्यास मदत झाल्याचे जाणकार सांगतात.

सोयाबीनची ७६ टक्के काढणी पूर्ण

ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणीत पावसाचा सतत व्यत्यय येत आहे. त्यामुळे यंदा सोयाबनची काढणी गेल्यावर्षीपेक्षा धीम्या गतीने सुरु आहे.

ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ७६ टक्के काढणी पूर्ण केली. तर मागील हंगामात याच काळातील सोयाबीन काढणी ८१ टक्क्यांवर होती. म्हणजेच यंदा सोयाबीनची काढणी गेल्यावर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT