Chana Procurement  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : हरभरा खरेदीसाठी बुलडण्यात ११ केंद्रे

हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. तर हरभऱ्याची खरेदी ११ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी दिली.

Team Agrowon

Buldana Chana News : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ‘नाफेड’तर्फे हमीदराने (MSP) हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात ११ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. तर हरभऱ्याची खरेदी ११ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी दिली.

जिल्ह्यात हरभरा खरेदीच्या उद्देशाने ११ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र वरवट बकाल, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खुर्द केंद्र साखरखेर्डा, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी किनगाव जट्टू, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी सिंदखेडराजा असे मान्यताप्राप्त केंद्र देण्यात आले आहेत.

या केंद्रांवर पणन विभागाने हरभरा नोंदणी सुरू करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी संदेश मिळताच आपला हरभरा खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असे आवाहनही काकडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: वाणगावात सूर्यफुलाची शेती बहरली

Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक

Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव

Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प

Women Empowerment: औसा तालुक्यातील चाळीस गावात महिला अस्मिता भवन

SCROLL FOR NEXT