Inflation Increase  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Drought Impact : शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ; दुष्काळामुळे शेती संकटात, महागाई वाढणार 

Inflation Increase : वाढत्या ऊन्हाबरोबर म्हणजेच उष्णतेबरोबर शेतीमालाच्या उत्पादनात घट होऊन महागाई वाढत जाईल. ही परिस्थितीत भविष्यात आणखी बिकट होणार आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News : वाढतं ऊन आपली चांगलीच चिंता वाढवणार आहे. वाढत्या ऊन्हाबरोबर म्हणजेच उष्णतेबरोबर शेतीमालाच्या उत्पादनात घट होऊन महागाई वाढत जाईल. ही परिस्थितीत भविष्यात आणखी बिकट होणार आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

तर दुसरीकडे भारताला दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, याची ठळक चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोरचे संकट वाढणार आणि याची चाहूल आतापासूनच लागली आहे. 

शेतीमालाची महागाई वाढली तर शेतकऱ्यांना याचे कसे परिणाम भोगावे लागतात, हे नव्यानं सांगायला नकोच.  पिकांचे उत्पादन कमी होऊन अन्नधान्य महागाई वाढल्यास सरकार लगेच महागाई कमी करण्यासाठी निर्णय घेते.

याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यात दुष्काळ आणि महागाईच्या काळात शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत असतो. एकतर उत्पादन कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतात. उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले तर सरकारं लगेच महागाईच्या नावाखाली भाव कमी करते. यातूनही शेतकऱ्यांचे नुकसान होते. 

केंद्रीय जल आयोगाने आपल्या अहवालात म्हटले की, देशातील मोठी चार धरणं मार्च महिन्यात कोरडी पडली. यापैकी तीन धरणं दक्षिण भारतातील आहेत. तर १० धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत पोचला. दक्षिण भारतातील धरणांमध्ये सरासरी २३ टक्के पाणीसाठा आहे.

तर ४२ धरणांपैकी ३० धरणांमधील पाणीसाठा ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. आंध्र प्रदेशातील पाणीसाठा केवळ ३१ टक्क्यांवर आला. तर एक मोठे धरण कोरडे पडले. कर्नाटक आणि तमिळनाडूतील परिस्थितीही बिकट आहे. महाराष्ट्रातील धरणांमधील जिवंत पाणीसाठी सरासरीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे, असेही केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केले. 

पाॅड्सडॅम इंस्टीट्यूट फाॅर क्लायमॅट इम्पॅक्ट रिसर्च आणि युरोपियन सेंट्रल बॅंक या संस्थांनी एक रिसर्च स्टडी प्रसिध्द केला. यात त्यांनी भविष्यात वाढत्या उष्णतेचे शेती आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार असल्याचे स्पष्ट केले. वाढत्या उष्णतेमुळे दुष्काळ आणि जास्त पाऊस अशा घटना वाढत जाणार आहे.

याचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होणार असून उत्पादन घटत जाईल. अर्थव्यवस्थेच्या सर्वच बाजूंवर याचा परिणाम दिसेल. तसेच अन्नधान्य महागाई २०२५ पर्यंत ३.२ टक्क्यांनी वाढेल. तसेच एकूण मगाहाई १.१८ टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज या रिसर्च रिपोर्टमध्ये देण्यात आला. 

ज्या वर्षात जास्त उष्णता किंवा दुष्काळ पडला त्या वर्षात अन्नधान्य महागाई वाढल्याचा आजवरचा अनुभव आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. यंदा आशियासह इतर काही देशांमध्ये पाऊस कमी पडला. याचा परिणाम शेतीवर स्पष्ट दिसून येत आहे. भारतातही यंदा कमी पाऊस झाला.

तसेच २०२४ हे वर्ष सुरुवातीपासून जास्त उष्ण ठरत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीतील सरासरी तापमान जास्त होते. तर मार्च महिन्यातच बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ४० अशांच्या पार पोचला. याचा परिणाम शेतीवर होत असून उत्पादन कमी होण्याचा धोका वाढला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT