Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याची चार महिन्यांत ९५ हजार टन विक्री

Bedana Production : यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे. परंतु बेदाणा निर्मितीस पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर प्रति किलोस २० ते ३० रुपयांनी अधिक आहेत.

त्यामुळे बेदाणा उत्पादकांना यंदाचा बेदाण्याचा हंगाम गोड बनला आहे. राज्यात गेल्या चार महिन्यांत सुमारे ९५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. प्रतवारीनुसार बेदाण्याला प्रति किलोस ११० ते २२० रुपये असा दर मिळत असून बेदाण्याचे दर टिकून आहेत.

येत्या काळात बेदाण्याच्या दरात फारसे चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. राज्यात या वर्षी २ लाख १५ हजार टन इतके बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. मुळात द्राक्ष हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान झाल्याने बेदाण्याचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५७ हजार टनांनी घटले आहे.

परंतु बेदाणा निर्मितीच्या काळात पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा निर्मिती झाला आहे. त्यामुळे दर्जेदार बेदाण्याला चांगले दर मिळत असल्याचे चित्र आहे. बेदाणा विक्रीचा हंगाम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला. या दरम्यान, बेदाण्याला ११० ते २१० रुपये असा दर मिळाला होता. मुळात होळी सणानिमित्त बेदाण्याची खरेदी फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामुळे बेदाण्याच्या दरात प्रति किलोस १५ ते २० रुपयांनी सुधारणा झाली होती.

मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत बेदाण्याला चांगले दर होते. त्यामुळे बेदाण्याला चांगले दर मिळत असल्याने आवक वाढली होती. या महिन्यात बेदाण्याची सर्वाधिक विक्री झाली. यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीचे नियोजन केले.

या दरम्यान, बेदाण्याचे दरही टिकून होते. सांगली, तासगाव, पंढरपूर या तीन बाजारपेठेत सुमारे एक हजार टन बेदाणा सौद्यासाठी येतो. त्यापैकी ५० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे. गेल्या चार महिन्यांत सुमारे ९५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सद्यःस्थितीला १ लाख २० हजार टन बेदाणा शीतगृहात आहे.

होळी, गोकुळ अष्टमी, गणपती, दसरा, दिवाळी या सणानिमित्त बेदाण्याला चांगली मागणी असून दरही चांगले मिळतात. त्यामुळे शेतकरी वर्षभर बेदाणा विक्रीचे नियोजन करतो. येत्या दोन महिन्यानंतर सण उत्सव सुरू होतात. त्यामुळे या दरम्यान बेदाणा खरेदीचे नियोजन जुलै महिन्यापासून व्यापाऱ्यांकडून सुरू होईल. सध्या १ लाख २० हजार टन बेदाणा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत पुरवठा येईल.

बेदाणा दर टिकून

गेल्या फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत बेदाण्याच्या दरात चढ-उतार झाले नाही. होळी सणाची खरेदी झाल्यानंतर बेदाण्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर बाजारात बेदाण्याची मागणी वाढली. त्यामुळे पुन्हा बेदाण्याचे दर वाढले.

त्यामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर बेदाण्याच्या दरात फारशी तेजी मंदी आली नाही. सध्या बाजारात बेदाण्याची मागणी चांगली असून उठावही चांगला होत आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून आहेत.

अंदाजे बेदाणा विक्री दृष्टिक्षेपात (टनांत)

महिना... टन

फेब्रुवारी...२० हजार

मार्च...३७ हजार

एप्रिल...२५ हजार

मे...१३ हजार...

एकूण...९५ हजार

प्रतवारीनुसार बेदाणा दर (प्रति किलो)

पिवळा...१५० ते २००

हिरवा...१२० ते २४०

गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याचे दर चांगले आहेत. दर्जेदार बेदाणा तयार झाल्याने उठावही चांगला होत आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत. येत्या महिन्यात बेदाण्याची विक्री वाढेल.
- सुशील हडदरे बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Agri Exhibition: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन नऊ जानेवारीपासून

Mango Season: हापूस यंदा एकाच टप्प्यात

Pomegranate Export: डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देणार : पणनमंत्री रावल

Maize Production: रब्बीत मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

SCROLL FOR NEXT