Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : परभणीत कापसाला ७२८० ते ७३९५ रुपयांचा दर

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७३१५ रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत प्रतिक्विंटल किमान ७२८० ते कमाल ७३९५ रुपये तर सरासरी ७३७५ रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत गेल्या आठवड्यात कापसाची प्रतिदिन १२२० ते २५५० क्विंटल आवक झाली. सोमवारी (ता. २०) ते शुक्रवारी (ता.२४) या कालावधीत एकूण ७५४५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी ७२९० ते ७३५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २४) कापसाची २५५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७३५५ रुपये तर सरासरी ७३०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २३) कापसाची ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७३७५ रुपये तर सरासरी ७३२५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २२) कापसाची १२५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ७१०० ते कमाल ७३८५ रुपये तर सरासरी ७२९० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. २१) १४२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७४३० रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २०) १२२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७४३० रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत शनिवारी (ता. २५) कापसाची ४०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७२८० ते कमाल ७३९५ रुपये तर सरासरी ७३७५ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २४) कापसाची ४३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३४० रुपये ते कमाल ७४३० रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २३) कापसाची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ७३१० ते कमाल ७४३५ रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २२) कापसाची २३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३४५ ते कमाल ७४५० रुपये तर सरासरी ७४१० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २१) कापसाची २५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ७५११ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT