Cotton Market : कापसाची उलाढाल वाढली; भावातही काहिशी सुधारणा

Cotton Rate : कापसाच्या भावात मागील आठवडाभरात किमान १०० रुपयांपर्यंत वाढ झाली. किमान भाव २०० रुपयांनी वाढले. किमान भाव ६ हजार ८०० रुपयांवरून आता ७ हजारांवर पोचले.
Cotton
Cotton Agrowon

Cotton Market Price : मागच्या काही दिवसांमध्ये कापसाच्या भावात किमान १०० रुपयांची सुधारणा झाली. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाची खरेदी विक्री वाढल्याचा आणि जिनिंगची धडधड सुरु होत असल्याचा परिणाम बाजारावर दिसला.

यंदा देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा ताळेबंद पाहिला तर सध्याचा भाव यंदाच्या हंगामातील निचांकी ठरण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. कापसाच्या भावात मागील आठवडाभरात किमान १०० रुपयांपर्यंत वाढ झाली. किमान भाव २०० रुपयांनी वाढले.

किमान भाव ६ हजार ८०० रुपयांवरून आता ७ हजारांवर पोचले. तर कमाल भाव ७ हजार ५०० रुपयांवर आहेत. सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांवर होता. ही परिस्थिती महाराष्ट्रात होती. कमाल भावाचा विचार करता कर्नाटक आणि गुजरातमध्ये कापसाचा कमाल भाव ७ हजार ६०० रुपयांवर होता.

Cotton
Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कापूसदरासाठी सरकारच्या मानगुटीवर बसू

सरकी ढेप म्हणजेच पेंड आणि सरकीतेल याचे भाव दबावात असल्याने सरकीचा भावही दबावात दिसतो. सरकीचा सरासरी भाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये २ हजार ८०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.

पण सरकी पेंडेला पुढील काळात काही कारणांमुळे उठाव मिळू शकतो. पण सरकी तेलाचे भाव देशातील खाद्यतेलाच्या दरावर अवलंबून राहू शकतात. सरकार निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन खाद्यतेलाचे भाव जास्त वाढू देण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे सरकी तेलाच्या भावात सध्यातरी मोठी तेजी दिसत नाही.

सीएआय म्हणजेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज एक लाख गाठीने कमी केला. पहिला अंदाज २९५ लाख गाठींचा होता.

आता दुसरा अंदाज ९४ लाख गाठींचा दिला. अंदाज कमी करण्यामागे सीएआयने कारण दिले बोंड अळीचे. हरियानात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे सीएआयचे म्हणणे आहे. सीएआयचा हा अंदाज आल्यानंतर देशातील कापूस बाजाराला आधार मिळाला, असेही अभ्यासकांनी सांगितले.

Cotton
Cotton Rate: बाजार समित्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? | Agrowon| ॲग्रोवन

बाजारात सुधारणा होण्याचेही संकेत आहेत. पण आपल्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बाजाराकडे बारीक लक्ष ठेऊन घडणाऱ्या घडोमोडी आणि त्याचा बाजारावर होणारा परिणाम याचा अभ्यासक करणे गरजेचे आहे, असे आवाहनही जाणकारांनी केले.

देशातील आणि जागतिक बाजारातील कापूस उत्पादन आणि मागणीची स्थिती पाहता. सध्याचा भाव हा कापसाचा किमान म्हणजेच हंगामातील कमीत कमी भाव ठरण्याची शक्यता आहे. देशातील बाजारात आता कापसाचे व्यवहार वाढत आहेत. कापसाच्या भावात पुढील महिनाभरात ५०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

सर्वच राज्यांत उत्पादन घट

सीएआयने आपल्या अंदाज म्हटले आहे की, उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान, हरियाना आणि पंजाबमध्ये उत्पादन घटले. तसेच मध्य भारतातही उत्पादन कमी झाले. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशचा यात समावेश आहे. तर दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात उथ्पादन कमी झाले, तर तमिळनाडूत उत्पादन वाढल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com