Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : मानवतमध्ये कापसाला ६२०० ते ७३१० रुपयांचा दर

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २) कापसाची ९०० क्विंटल आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३१० रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले.

जिल्ह्यात गेल्या आठड्यात मान्सुनोत्तर पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजला. त्यामुळे वेचणी शक्य झाली नाही. परिणामी बाजार समित्यांतील कापसाची आवक कमी राहिली. कमाल दरामध्ये १५० ते २०० रुपयांनी घसरण झाली.

मानवत बाजार समितीत गेल्या आठवड्यात कापसाची प्रतिदिन ९०० ते १६०० क्विंटल आवक झाली. मंगळवारी (ता. २८) ते शनिवारी (ता. २) या कालावधीत एकूण ५९१० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी ६२०० ते ७२७५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १) कापसाची ९८५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७२६० रुपये तर सरासरी ७२०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ३०) ९७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७११० ते कमाल ७२९० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २९) १४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७२८० रुपये तर सरासरी ७२२५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २८) १६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७२६० रुपये तर सरासरी ७२१० रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत गुरुवारी (ता. ३०) कापसाची ५५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३०५ ते कमाल ७३४५ रुपये तर सरासरी ७३३० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २९) कापसाची ४१० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७२०५ ते कमाल ७२३० रुपये तर सरासरी ७२२० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. २) कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७१०५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १) कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७१०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ३०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७१९० तर सरासरी ७१८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २९) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१४५ ते कमाल ७२११ तर सरासरी ७१७५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT