Cotton Production : भारत जगातील सर्वाधिक कापूस उत्पादक देश व्हावा

Cotton Market : जगातील सर्वाधिक कापूस लागवड क्षेत्र भारतात असले, तरी सर्वाधिक उत्पादक म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
Cotton production
Cotton productionAgrowon

Mumbai News : ‘‘भारताला जगातील सर्वाधिक कापूस उत्पादक देश होण्याची आवश्‍यकता आहे. जगातील सर्वाधिक कापूस लागवड क्षेत्र भारतात असले, तरी सर्वाधिक उत्पादक म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांच्या स्पर्धेत राहण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला उत्पादकता वाढीकरिता प्रयत्न करावे लागतील,’’ असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी (ता. २) मुंबई येथे केले.

जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या ८१ व्या बैठकीच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. गोयल बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅकनबर्ग यांच्यासह ३३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Cotton production
Cotton Advisory : आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची आजपासून बैठक

गोयल म्हणाले, ‘‘कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान, हवामान, उत्पादन नवकल्पना, ब्रँडिंग, गुणवत्ता हमी इत्यादींसह इतर समस्या आणि इतर विषयांची नीट मांडणी गरजेची आहे. या बैठकीद्वारे सर्व देशांना त्यांचे अनुभव त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सादर करण्याची संधी आहे. आर्थिक विकासात या विचारमंथनातून भागीदारी निर्माण होऊ शकते.’’

राशी म्हणाल्या, ‘‘आम्हाला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्री यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दिला जातो. या बैठकीला सुमारे ४०० प्रतिनिधी उपस्थित आहेत. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बोलिव्हिया, ब्राझील, कॅमेरून, कोलंबिया, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोलंड, जपान, केनिया, मलय, मोझांबिक, नायजेरिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, सुदान, स्वित्झर्लंड, इव्हान, टांझानिया, तुर्की, युनायटेड किंगडम, यूएसए, उझबेकिस्तान, झांबिया या देशांचा सहभाग आहे.

Cotton production
Cotton Procurement : सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र शेंदुर्णीत सुरू

या बैठकीतील सत्रांदरम्यान आम्ही विविध विषयांवर प्रकाश टाकणार आहोत. चार दिवस चालणाऱ्या परिषदेत वस्त्रोद्योग मूल्यसाखळीतील सर्व भागधारक, उद्योगपती, महत्त्वाचे व्यावसायिक प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधक सहभागी होणार आहेत.’’

‘कापूस उद्योगावर चर्चेसाठी जागतिक मंच उपलब्ध’

‘‘भारत हा ‘आयसीआयसीआय’चा संस्थापक सदस्य आहे आणि संलग्नतेला मनापासून महत्त्व देतो. या बैठकांमुळे जगासाठी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, कापूस उद्योगासंबंधी चर्चा करण्यासाठी एक मंच उपलब्ध होत आहे. कापूस उत्पादक आणि व्यापारी देशांतील नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे,’’ असेही श्री. गोयल म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com