Onion Market
Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

Team Agrowon

लासलगाव ः गेल्या सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार (Market) आवारावर उन्हाळ कांद्याची (Onion) ६५,८२० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ७०० कमाल रुपये ३,०५३ तर सर्वसाधारण रुपये २,०१० तर लाल कांद्याची १४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये २,१३१ कमाल रुपये २,१३१ तर सर्वसाधारण रुपये २,१३१ प्रती क्विंटल राहीले.

लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :- गहु (५५६ क्विंटल) भाव १,८०० ते ३,०९१ सरासरी २,६६३ रुपये, बाजरी लोकल (६६ क्विंटल) भाव २,००० ते २,७०० सरासरी २,२०७ रुपये, ज्वारी लोकल (०२ क्विंटल) भाव १,७०० ते २,९०७ सरासरी २,३०४ रुपये, हरभरा लोकल (६६ क्विंटल) भाव ३,६०० ते ४,८०० सरासरी ४,१८८ रुपये, हरभरा जंबु (०३ क्विंटल)

भाव ४,००१ ते ४,८०० सरासरी ४,६५१ रुपये, हरभरा काबुली (८९ क्विंटल) भाव ३,७०० ते ७,००२ सरासरी ५,६०१ रुपये, सोयाबीन (९,९८६ क्विंटल) भाव ३,००० ते ५,९४० सरासरी ५,६६३ रुपये, मुग (५९ क्विंटल) भाव ४,२०१ ते ८,२०० सरासरी ७,६१३ रुपये, मका (१८,८७४ क्विंटल) भाव १,५०० ते २,२०१ सरासरी २,०८१ रुपये प्रती क्विंटल राहीले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :- उन्हाळ कांदा (१२,७०५ क्विंटल) भाव रुपये ५०० ते २,७६७ सरासरी रुपये १,९००, सोयाबीन (१०,५९३ क्विंटल) २,४०० ते ६,०६६ सरासरी ५,६५० रुपये, मका (१,३६८ क्विंटल) १,६०० ते २,१६० सरासरी २,०६० रुपये, गहू (२६१ क्विंटल) २,००१ ते ३,१५१ सरासरी २,७११ रुपये, मुग (१० क्विंटल) २,२०० ते ७,२०१ सरासरी ६,२०१ रुपये, हरभरा (३८ क्विंटल) ३,७०० ते ५,४२६ सरासरी ४,५०० रुपये प्रती क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :- उन्हाळ कांदा (४०,३०५ क्विंटल) भाव रुपये ७०० ते ३,१०१ सरासरी रुपये २,४५०, गहू (१६८ क्विंटल) २,४०० ते ३,०२५ सरासरी २,८५१ रुपये, बाजरी (२२ क्विंटल) १,८०० ते २,६४१ सरासरी २,००० रुपये, मका (८,९३० क्विंटल) १,३०० ते २,१३५ सरासरी १,९५१ रुपये, मुग (१० क्विंटल) ३,००० ते ७,६०० सरासरी ७,००० रुपये, सोयाबीन (१६,६२२) क्विंटल ३,००० ते ५,८५८ सरासरी ५,६०० रुपये प्रती क्विंटल राहीले, अशी माहिती बाजार समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT