Milk Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : दूध संघाकडून खरेदी दरात ७० पैशांची वाढ

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने (दूध पंढरी) शुक्रवारी (ता. २१) गाईच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर ७० पैशांची वाढ केली आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने (दूध पंढरी) शुक्रवारी (ता. २१) गाईच्या दूध खरेदीदरात (Cow Milk Purchase) प्रतिलिटर ७० पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे नवा दर (Milk Rate) आता ३६ रुपये ७० पैसे इतका झाला आहे. या आधीच १ ऑक्टोबरपासून दूधदरात एक रुपयाची वाढ केली होती. त्यानंतर पंधरवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात हा निर्णय झाला. या बैठकीत संघाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. २० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या दूध बिलाची सर्व रक्कम दिली आहे. तसेच नव्याने ७० पैशांची दरवाढ २१ ऑक्टोबरपासून लागू करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

त्याशिवाय टेंभुर्णी येथील शीतकरण केंद्रासमोर ७० गाळे उभारण्याचा तसेच मुंबई येथील संघाच्या जागेचे मूल्यांकन २८ कोटी ८६ लाख रुपये इतके झाले असून, ई-निविदा काढून या जागेच्या विक्रीचा निर्णयही या वेळी झाला. अक्कलकोट तालुक्यातील दोन एकर ३४ गुंठे जमिनीचे ९४ लाख ६२ हजार तर शेटफळच्या ५ एकर जमिनीचे एक कोटी ८० लाख रुपये मूल्य झाले असून, ही जमिनीही विक्री करण्याचा निर्णय यात झाला.

या बैठकीला संचालक विजय येलपले, संभाजी मोरे, औदुंबर वाडदेकर, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, मारुती लवटे, सुरेश हसापुरे, मनोज गरड, जयंत साळे, राजेंद्र पाटील, वैशाली शेंबडे, छाया ढेकणे, निर्मला काकडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT