Jowar  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Rate : बारामतीत ज्वारीला मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर

Jowar Market Update : माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हणमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे.

Team Agrowon

Pune News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १०) ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हणमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे.

चांगल्या दर्जाच्या गव्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळाला. मक्याला २७७१ रुपये प्रति क्विंटल, बाजरी, हरभरा, तूर, उडीद या शेतीमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल २५०१, हरभरा ४७८१, तूर ९०११, उडीद ८१४० व खपली गव्हासाठी २५२० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

खरेदीदार म्हणून आवारातील बाळासाहेब फराटे, महावीर वडूजकर, मिलिंद सालपे, शशिकांत सालपे, जगदीश गुगळे, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे यांनी सहभाग घेतला.

बाजार आवारात शेतीमालास चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली.

दरम्यान, ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यांतून आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यांतून शेतीमालाची आवक होते. मुख्य बाजार आवारात ग्रेडिंग मशिन असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी आणखी एक नवीन मशिन बसविण्याचा समितीचा मानस आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल.

त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल. तसेच समितीने आवारात शेतीमाल आल्यानंतर प्रथम वजनानंतर लिलाव अशी सुविधा असल्याने लगेच पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव अरविंद जगताप केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT