Kharif Jowar : खरीपात कोणत्या ज्वारीची करावी पेरणी, एक्सपर्ट काय सांगतात?

Team Agrowon

चाऱ्याची कमतरता

पावसाच्या अनियमितपणामुळे जनावरांच्या चाऱ्याची कमतरता जाणवते. म्हणून खरीप हंगामात ज्वारीची पेरणी केली जाते.

Kharif Jowar | agrowon

वाणांची निवड

त्यामुळे खरीप हंगामामध्ये धान्य आणि चारा उत्पादनासाठी चांगल्या वाणाची निवड करण गरजेचं आहे.

Kharif Jowar | agrowon

पी.व्ही.के. ८०१

ज्वारीचे पी.व्ही.के. ८०१ म्हणजेच परभणी श्‍वेता या वाणाचे दाणे टपोरे व पांढरे शुभ्र आहेत. ११५-१२० दिवसांत तयार होते. यातून हेक्‍टरी ३२-३५ क्विंटल धान्याचे व १०-१२ टन चाऱ्याचे उत्पन्न मिळतेे.

Kharif Jowar | agrowon

सी.एस.एच-१४

या वाणापासून १००-१०५ दिवसात उत्पादन तयार होते. यातून ४०-४५ क्विंटल धान्याचे, तर ८.५-९ टन कडब्याचे उत्पन्न मिळते.

Kharif Jowar | agrowon

सी.एस.एच.-१६

हे वाण १०५-१०७ दिवसात हाती येते. यातून ४०-४२ क्विंटल धान्य तर कडबा उत्पादन ९ ते ९.५ टन प्रतिहेक्‍टर मिळते.

Kharif Jowar | agrowon

सीएसएच- २५

ज्वारीचे सीएसएच- २५ म्हणजेच परभणी साईनाथ हे वाण ११० दिवसांत पक्व होते. या वाणापासून प्रतिहेक्‍टरी ४३.३ क्विटल धान्य आणि १२०.७ क्विटल कडब्याचे उत्पादन मिळते.

Kharif Jowar | agrowon

एसपीएच १६३५

ज्वारीचे एसपीएच १६३५ हे वाण १०८ ते ११० दिवसात पक्व होतो. या वाणा पासून हेक्‍टरी ३८ ते ४० क्विंटल धान्याचे आणि ११८ ते १२० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते.

Kharif Jowar | agrowon

उत्पादक वाढते

 मशागतीनंतर ज्वारीची पेरणी केल्यास ओलाव्याच्या अभावामुळे ज्वारीची उगवण कमी होते. त्यामुळे चांगला पाऊस पडल्याने ज्वारीची पेरणी केल्यास ज्वारीची उगवण व उत्पादकता वाढण्यास मदत होते.

Kharif Jowar | agrowon
rupali chakankar | agrowon
आणखी पहा