Turmeric rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हिंगोलीत हळदीला क्विंटलला ६००० ते ७५०० रुपये दर

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली बाजार समितीतील संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे. शुक्रवारी (ता.१६) हळदीची १८३५ क्विंटल आवक झाली होती. या वेळी हळदीला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७५०० रुपये तर सरासरी ६७५० रुपये दर मिळाले.

हिंगोली येथे मराठवाडा -विदर्भातील विविध जिल्ह्यांतून हळदीची आवक वाढली आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यंदाच्या मेपासून आठवड्यातील सहा दिवस हळदीची आवक घेतली जात आहे.

सोमवार (ता.१२) ते शुक्रवार (ता. १६) या कालावधीत दररोज १८३५ ते २५०० क्विंटल अशी एकूण १० हजार ५८५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ७५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१५) १८५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ६४४२ रुपये दर मिळाले.

भिजलेल्या हळदीला कमी दर

यंदा मार्च, एप्रिलमध्ये शिजवल्यानंतर शेतामध्ये वाळवत घातलेली हळद अवकाळी पावसात भिजली. त्यामुळे हळकुंडाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. मार्केटमध्ये भिजलेली हळद कमी दराने खरेदी केली जात आहे. सोमवार (ता.१२) ते शुक्रवार या कालावधीत भिजलेल्या हळदीला प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ६२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT