Team Agrowon
देशातील बाजारात हळदीचे भाव सध्या नरमले आहेत.
वायद्यांमधील सुधारणेमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये बाजार समित्यांमध्येही दरवाढ झाली होती. दरात वाढ झाल्यानंतर देशात ५ ते ६ लाख टन हळदीची विक्री झाली.
पण हळदीच्या भावातील सुधारणा जास्त दिवस टिकली नाही. देशातील लग्नसराईचा हंगाम आता संपला. त्यामुळे हळदीचा उठाव कमी झाला.
सांगली आणि निजामाबाद येथील हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. या दोन्ही ठिकाणी सुमारे दोन लाख पोती अजूनही शेतकऱ्यांकडे विक्रीविना शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदा हळदीला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसला. त्यामुळे गुणवत्तापूर्ण हळदीचे उत्पादन कमी झाले.
गुणवत्तापूर्ण हळदीचा पुरवठा कमी असल्याने ६७०० ते ८००० रुपये दर मिळाला. पण आता उठाव कमी असल्याने हळदीला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.
देशात सध्या हळदीचा स्टाॅक चांगला आहे. निर्यातीची गती वाढण्याचा अंदाज असला तरी सध्याची स्थिती तशी नाही.
त्यामुळे पुढील काही दिवस हळदीच्या भावात क्विंटलमागं ५०० रुपयांचे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.