Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export : ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी; बंदी उठली का? कांदा निर्यातीला परवानगी दिल्यामुळे भाव वाढतील का?

Onion Market : सरकार ३ लाख टन कांदा निर्यातीला परवानगी देईल, अशी चर्चा सुरु असतानाच सरकारने फक्त ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितले.

Anil Jadhao 

Pune News :`खोदा पहाड निकला चुहा`, अशी गत कांदा निर्यातीबाबत झाली. सरकार ३ लाख टन कांदा निर्यातीला परवानगी देईल, अशी चर्चा सुरु असतानाच सरकारने फक्त ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितले. ही निर्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत होणार आहे. म्हणजेच निर्यातबंदी आहे तोपर्यंत ही निर्यात करण्याला सरकारने परवानगी दिली. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली नाही. निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक झाली होती. या बैठकीत कांद्याची मागणी करणाऱ्या देशांना सरकार ते सरकार पातळीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. म्हणझेच सरकार जेवढा कोटा देईल तेवढी निर्यात करण्याला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार सरकारने कांदा निर्यातीचा कोटा ठरवून दिला आहे. 

केंद्रीय सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितलं की, व्यापाऱ्यांना ५४ हजार ७६० टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. ही निर्यात चार देशांना होणार आहे. त्यात बांगलादेश, माॅरिशस, बहरिन आणि भुटान या चार देशांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक निर्यात बांगलादेशला होणार आहे. बांगलादेशला सर्वाधिक ५० हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली. तर माॅरिशसला १२०० टन, बहरिनला ३ हजार टन आणि भुटानला ५६० टन कांदा निर्यात करण्यास केंद्राने परवानगी दिली. 

विशेष म्हणजे ही निर्यात लगेच सुरु होऊ शकते. निर्यात करण्याला ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंतच निर्यात करता येणार आहे. विशेष म्हणजे कांदा निर्यातीवरील बंदीही ३१ मार्चपर्यंत आहे. पण सरकार नेमकं निर्यातीची ही प्रक्रिया कशी राबवते, याची स्पष्टता अधिसूचना निघाल्यानंतरच येईल, असे निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. 

सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली मात्र निर्यातीचा कोटा कमी आहे. त्यामुळे कांदा बाजारावर याचा फार मोठा परिणाम दिसून येईल, असे वाटत नाही. कांदा भावात काहीशी सुधारणा दिसू शकते. पण या निर्यातीच्या कोट्यावरून बाजारातील सेंटीमेंट कसे तयार होते, हे पाहावे लागेल, असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्येच जाहीर करा; राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची मागणी

Sugarcane Season 2024 : कृष्णा कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Season 2024 : सिंधुदुर्गात रब्बी हंगामाला प्रारंभ; मशागतीला वेग

Rabi Season 2024 : सातारा जिल्ह्यात रब्‍बी पिकांच्या पेरणीस वेग

SCROLL FOR NEXT