Onion Rate
Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : लासलगावी उन्हाळ कांद्याला ५०० ते २७२१ रुपये दर

टीम ॲग्रोवन

लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार (Lasalgaon APMC) आवारावर उन्हाळ कांद्याची (Summer Onion) ७४ हजार ७५८ क्विंटल आवक (Onion Arrival) होऊन बाजारभाव (Onion Market Rate) किमान ५०० रुपये, कमाल २,७२१ रुपये, तर सर्वसाधारण १,७२६ रुपये प्रति क्विंटल राहीले.

मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रति क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) : गहु (५३७ क्विंटल) दर किमान २,४०० रुपये ते कमाल ३,१०१ रुपये तर सरासरी २,७४१ रुपये, बाजरी लोकल (१०७ क्विंटल) दर २,००० ते ३,११६ सरासरी २,४६५ रुपये, ज्वारी लोकल (२ क्विंटल) दर १,७०१ ते १,८५१ सरासरी १,७७६ रुपये,

हरभरा लोकल (५१ क्विंटल) भाव ३,६०० ते ५,०९१ सरासरी ४,१५४ रुपये, हरभरा जंबू (५३ क्विंटल) भाव ३,००० ते ४,३६१ सरासरी ४,१८१ रुपये, हरभरा काबुली (५१ क्विंटल) दर ३,००० ते ५,७१२ सरासरी ५,१८२ रुपये, सोयाबीन (९,४२३ क्विंटल) दर ३,००० ते ५,८७५ सरासरी ५,६६२ रुपये, मूग (७९ क्विंटल) भाव २,००० ते ८,४०१ सरासरी ७,७९० रुपये, मका (३२,३१८ क्विंटल) भाव १,५०० ते २,१९९ सरासरी २,०७९ रुपये प्रति क्विंटल राहिले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) : उन्हाळ कांदा (१७,३१० क्विंटल) भाव रुपये ४०० ते २,४०० सरासरी रुपये १,६००, सोयाबीन (७,०२५ क्विंटल) १,३०१ ते ५,९४० सरासरी ५,६९० रुपये, मका (१,८७९ क्विंटल) १,६०३ ते २,१११ सरासरी १,९६१ रुपये, गहू (२५२ क्विंटल) २,२०० ते २,८९९ सरासरी २,७३१ रुपये, मुग (१२ क्विंटल) २,५०२ ते ७,४०० सरासरी ६,८०० रुपये, हरभरा (१५ क्विंटल) ३,००० ते ४,४३५ सरासरी ४,००० रुपये प्रती क्विंटल राहिले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) : उन्हाळ कांदा (५७,७३० क्विंटल) भाव रुपये ५०० ते २,६०१ सरासरी रुपये २,०००, गहू (११४ क्विंटल) २,२०० ते ३,००० सरासरी २,६११ रुपये, बाजरी (३ क्विंटल) १,६०० ते २,५०१ सरासरी १,८०१ रुपये, मका (१४,७८१ क्विंटल) १,५०० ते २,२२१ सरासरी २,००० रुपये, मुग (१७ क्विंटल) ३,००० ते ८,००० सरासरी ७,२५१ रुपये, सोयाबीन (११,४७७) क्विंटल ३,००० ते ६,१५१ सरासरी ५,९०० रुपये प्रति क्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT