Onion Cultivation : धुळ्यातील कांदा लागवड कमीच

कांदा लागवडीसाठी खानदेशात अग्रेसर राहणाऱ्या धुळ्यातील कांदा लागवड यंदाही कमीच किंवा स्थिर राहू शकते.
Onion Planting
Onion PlantingAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः कांदा लागवडीसाठी (Onion Planting) खानदेशात अग्रेसर राहणाऱ्या धुळ्यातील कांदा लागवड यंदाही कमीच किंवा स्थिर राहू शकते. वाढता खर्च आणि दरांमधील अनिश्‍चितता यामुळे लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साह नाही. खानदेशात एकूण लागवड १० ते ११ हजार हेक्टरवर राहील, असे दिसत आहे.

Onion Planting
Onion Rate : केंद्रीय मंत्र्यांनाही ‘नाफेड’च्या कांदा खरेदीची सखोल माहिती मिळेना

खरिपातील कांदा लागवडदेखील खानदेशात यंदा सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरने कमी झाली होती. त्यात अतिपावसात अनेकांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले. उशिराचा खरीप कांदा लागवडही घटली आहे. आता उन्हाळ किंवा रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या कांद्यासंबंधीचे नियोजन काही शेतकरी करीत आहेत.

परंतु दरांमधील अनिश्‍चितता आणि वाढता खर्च यामुळे ही लागवड घटेल, असा अंदाज आहे. सध्या कांदा बियाण्याचे दर आवाक्यात आहेत. घरगुती किंवा शेतकऱ्यांकडे ३०० ते ५०० रुपये प्रतिकिलो आणि बाजारात ८००, १००० ते १८०० रुपये प्रतिकिलोपर्यंत कांदा बियाण्याची विक्री सुरू आहे. अनेक शेतकरी घरगुती किंवा थेट शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला पसंती देत आहेत.

Onion Planting
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

कारण घरगुती बियाणेदेखील दर्जेदार आहे. त्याची विक्री चोपड्यातील अडावद, जळगावमधील म्हसावद, एरंडोल, धरणगाव आदी भागांत सुरू आहे. उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी रोपवाटिकांत रोपे तयार होत आहेत. रोपवाटिकांत मागील आठवड्यातच काही शेतकऱ्यांनी बियाणे टाकले.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव, यावल या भागात रोपवाटिका अधिक आहेत. धुळ्यात धुळे, शिंदखेडा व साक्री भागात कांदा लागवड अधिक असते. याच भागात रोपवाटिकादेखील आहेत. धुळ्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर, जळगावात सुमारे पाच हजार हेक्टर आणि नंदुरबारात सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे.

Onion Planting
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

२०१९ मध्ये खानदेशात उन्हाळ कांदा लागवड १४ हजार हेक्टरवर झाली होती. यानंतर लागवड सतत कमी राहिली आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, जळगाव या तालुक्यांत अधिकची कांदा लागवड असणार आहे. काही शेतकरी याच महिन्यात अखेरीस आगाप लागवड करतील. तर नियमीत लागवड डिसेंबरच्या मध्यात किंवा शेवटच्या आठवड्यात होईल, असे दिसत आहे.

कांदा लागवड आमच्याकडे स्थिर राहील. रोपवाटिका तयार होत आहेत. काही शेतकरी याच महिन्यात आगाप लागवड करतील. पण वाढता खर्च लक्षात घेता दर स्थिर राहणे किंवा हमीभाव आवश्यक आहे.

- समाधान पाटील,

कांदा उत्पादक, किनगाव (जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com