Groundnut Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Groundnut Market : हिंगोलीत भुईमूगाच्या शेंगांना ४८०० ते ६६८० रुपयांचा दर

माणिक रासवे

Hingoli News : जिल्ह्यातील हिंगोली व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमूग शेंगांची (सुकी) आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यात या दोन बाजार समित्यांमध्ये भुईमूग शेंगांची एकूण १४४५ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ६६८० रुपये तर सरासरी ५७४० रुपये दर मिळाले.

हिंगोली बाजार समितीमध्ये स्थानिक परिसरातून भुईमूग शेंगाची आवक आठवड्यातील एक दोन दिवसाआड होत आहे. मागील आठवड्यात दोन दिवसात भुईमूग शेंगांची १३०० क्विंटल आवक झाली.

गुरुवारी (ता. ४) भुईमूग शेंगाची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ६६८० रुपये तर सरासरी ६४४० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २) भुईमूग शेंगांची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६१४० ते कमाल ६६६० रुपये तर सरासरी ६४०० रुपये दर मिळाले.

सेनगाव बाजार समितीमध्ये दररोज भुईमूग शेंगांची आवक होत आहे. शुक्रवारी (ता. ५) भुईमूग शेंगांची ४४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५३०० रुपये तर सरासरी ५१०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ४) ३६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५१०० ते कमाल ५३०० रुपये तर सरासरी ५२०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ३) ३३ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २) भुईमुग शेंगांची ३२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५२०० रुपये तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

SCROLL FOR NEXT