Groundnut Rate : भुईमुगाचे दर दबावात

Groundnut Market : घटलेली उत्पादकता आणि बाजारातही गेल्यावर्षीच्या तुलनेत क्‍विंटलमागे १००० रुपयांनी कमी मिळणारा दर यामुळे भुईमूग उत्पादक जेरीस आला आहे.
Groundnut Rate
Groundnut RateAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : घटलेली उत्पादकता आणि बाजारातही गेल्यावर्षीच्या तुलनेत क्‍विंटलमागे १००० रुपयांनी कमी मिळणारा दर यामुळे भुईमूग उत्पादक जेरीस आला आहे. त्यातच शेतमालात माती असल्याचे कारण देत क्‍विंटलमागे एक किलो कट्टी देखील घेतली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

यवतमाळ बाजाराचा विचार करता या ठिकाणी आवक १००० क्विंटलच्या आसपास आहे. या ठिकाणी भुईमुगाला ५२०० ते ५९०५ रुपयांचा दर मिळत आहे. यवतमाळ जिल्हा उन्हाळी भुईमुगाकरिता ओळखला जात होता. परंतु गेल्या काही वर्षात या पिकावर कीड आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भुईमुगाखालील क्षेत्रात मोठी घट झाली.

Groundnut Rate
Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

हे क्षेत्र आता तिळाखाली आले आहे. दरम्यान २०२३-२४ या वर्षात ९ हजार ७४६ हेक्‍टरवर भुईमुगाची लागवड करण्यात आली. मात्र यावर्षी खुल्या बाजारात भुईमुगाचे दर दबावात आले आहेत. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. त्यातच भुईमुगाचा उतारा देखील घटल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Groundnut Rate
Groundnut Rate : नव्या भुईमुगाचे दर दबावात

अमरावती बाजार समितीत ५५०० ते ६००० रुपये क्‍विंटलने भुईमुगाचे व्यवहार होत आहेत. रोजची सरासरी ५०५ क्‍विंटल इतकी आवक सध्या बाजारात होत आहे. वाशीम जिल्ह्याच्या कारंजा (लाड) बाजार समितीत आवक १४०० क्‍विंटलच्या पुढे आहे. या परिसरात देखील मोठ्या क्षेत्रावर भुईमूग लागवड होते. यंदा या बाजार समितीत भुईमुगाला ४६०० ते ६२७० रुपयांचा दर मिळत आहे. शेंगाचा दर्जा पाहून व्यापारी दर ठरवितात, असे सांगण्यात आले. कारंजा बाजार समितीत भुईमुगाला सरासरी ५७०० रुपयांचा दर मिळाला.

कळमना बाजारात आवक, दरही कमी

नागपूरच्या कळमना बाजारात भुईमुगाची आवक आणि दरही कमी असल्याचे चित्र होते. गेल्या आठवडाभरापासून शेंगाची आवक अवघी २२ क्‍विंटलवर स्थिरावली आहे. याला ४००० ते ५००० रुपयांचा दर मिळत आहे.

शेतकऱ्यांकडून कट्टी

भुईमूग शेंगामध्ये माती राहते, असे कारण सांगत प्रति क्‍विंटल एक किलोची कट्टी काही बाजार समित्यांमध्ये घेतली जाते. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com