Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Market : श्रावणातच पानांच्या दरात ४० टक्क्यांनी घट

Betel Leaf Rate : श्रावण महिन्यात पूजेसाठी पानांची मागणी असते. पानांच्या बाजारपेठेतून उठावही चांगला होत असल्याने पानांचा चांगले दरही मिळतात.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : श्रावण महिन्यात पानांच्या बाजारपेठेत खाऊच्या पानांना अधिक मागणी असते. मात्र, यंदाचा श्रावण महिना सुरु झाला असला तरी, पानांच्या बाजारपेठेत खाऊच्या पानांची मागणी कमी झाली असल्याने पुरेसा उठाव होत नाही. परिणामी पानांच्या दरात अंदाजे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे पान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

श्रावण महिन्यात पूजेसाठी पानांची मागणी असते. पानांच्या बाजारपेठेतून उठावही चांगला होत असल्याने पानांचा चांगले दरही मिळतात. त्यानुसार पान उत्पादक पानांचा खुडा आणि विक्रीचे नियोजन करत असतो. पानांचा हंगाम सुरु झाल्यापासून पानांच्या पेठांत पानांची मागणी आणि उठावही झाला. त्यामुळे मे महिन्यापासून पानांचा अपेक्षित दर मिळाले.

जून महिन्यात पुन्हा पानांच्या मागणीत आणि उठाव वाढल्याने पानांच्या दरात प्रति डागाला २०० ते ५०० रुपयांची दर वाढ झाली. यामुळे पान उत्पादकांना दिलासा मिळाला. जुलैमध्ये कळी पानांना ३००० रुपये, फाफडा ३५००, हक्कल ८०० प्रति डाग (एका डागात १२ हजार पाने) असे दर होते.

मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, गुजरात, लातूर, धाराशिव, पंढरपूर या ठिकाणी पानांची विक्री होते. जुलै महिन्यात पानांचे दर टिकून होते. श्रावण महिन्यात या पानांच्या बाजारपेठेतून सांगलीच्या पानांना अधिक मागणी असते.

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पान उत्पादक पानांचा खुडा करण्याचे नियोजन करून विक्रीची व्यवस्था करतो. मात्र, यंदाच्या श्रावण महिन्यात पेठांमध्ये पानांची मागणी वाढली नाही. त्यामुळे पानांचा उठाव होत नाही. परिणामी श्रावणाच्या सुरवातीलाच पानांच्या दरात ३० टक्क्यांनी दर कमी झाले आहेत.

श्रावण आणि गणपती या दरम्यान, पानांना अपेक्षित दर मिळतात. परंतु सध्या श्रावणाच्या प्रारंभीच पानांची मागणी नसल्याने उठाव नाही. परिणामी दर कमी आहेत. परंतु श्रावण महिना आणि गणेशोत्सवात पानांना अधिक मागणी आणि उठावही चांगला होतो. त्या खाऊच्या पानांच्या दरात वाढ होणार अशी आशा पान उत्पादकांना आहे.

खाऊच्या पानाचे दर (एका डागात १२ हजार पाने)

कळी ः २००० ते २२००

फाफडा ः ५०० ते ३०००

हक्कल ः ५०० ते ६००

गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यात पानांची मागणी चांगली असून दरही चांगले मिळतात. मात्र, यंदा श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून दर कमी असल्याने संकट ओढावले आहे. येत्या काळात दर वाढतील, अशी आशा आहे.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक, नरवाड, ता. मिरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Crop Loss: राज्यात ५ लाख ४९ हजार हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट

Nanded Rain : नांदेडमध्ये मुसळधार पाऊस; विष्णुपुरी धरणाचे ८ दरवाजे उघडले

Parbhani Rainfall : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा कहर

Satara Rain : दमदार पावसामुळे साताऱ्यातील पाच धरणांतून विसर्ग सुरू

Latur Rain : कर्नाटक सीमावर्ती भागांत पावसाने नुकसान

SCROLL FOR NEXT