Coconut Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Coconut Production : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ उत्पादनात ४० टक्के घट

Coconut Export : लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढरी माशी, कोळेरोगांसह विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे या वर्षी जिल्ह्यातील नारळ उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढरी माशी, कोळेरोगांसह विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे या वर्षी जिल्ह्यातील नारळ उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे आंबा, काजू, सुपारीपाठोपाठ सुरक्षित मानले जात असलेले नारळ पीकदेखील बदलत्या वातावरणाचा बळी ठरत असल्यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक नारळ लागवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. राज्यात ३३ हजार हेक्टरवर नारळ लागवड असून, त्यातील १८ हजार हेक्टर लागवड ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. नारळ उत्पादन जिल्ह्याच्या सर्वच भागांत घेतले जात असले तरी वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, मालवण या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवड आहे. येथील पोषक वातावरण आणि कीड-रोगांचा किमान प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नारळ पिकांची लागवड वाढली आहे. परंतु हेच नारळ पीक आता बदलत्या वातावरणाचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी ६ ते ७ जूनला सिंधुदुर्गात दाखल होणारा मॉन्सून १२ जूनला नावापुरताच हजर झाला. परंतु २३ जूनला तो सक्रिय झाला. जिल्ह्यात एप्रिल-मेमध्ये नारळाच्या झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच मॉन्सून लांबला, तर दुसरीकडे जुलैमध्ये ५० टक्के पाऊस झाला. याचा विपरीत परिणाम नारळ पिकांवर झाला. एप्रिल ते जुलै अखेरपर्यंत नारळाला आलेल्या फुलोऱ्याचे उत्पादन निम्मेच आले आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नारळाच्या झावळ्यांचा आकारदेखील या कालावधीत कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय नारळावर पांढरी माशी, कोळेरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत बदलत्या वातावरणापासून सुरक्षित मानले जाणारे नारळ पीकदेखील संकटात सापडले आहे. निम्मेच उत्पादन आल्यामुळे नारळ बागायतदारांना फटका बसला आहे.

नारळाचे एक झाड साधारपणे १०० फळांचे उत्पादन देते. माझे दरवर्षी ५ हजार नारळांचे उत्पादन होते. परंतु या वर्षी तीन हजारच फळे मिळाली. या वर्षी उत्पादनात मोठी घट आहे.
- प्रदीप प्रभू, नारळ उत्पादक, परुळे, ता. वेंगुर्ला
ज्या नारळ उत्पादकांचे उत्पादन घटले आहे, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांच्या बागेला फळसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांसह भेट देतील. पाहणी करून उपाय सुचविता येतील.
- गोरखनाथ गोरे, तालुका कृषी अधिकारी, सावंतवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT