Team Agrowon
व्हर्जीन कोकोनट ऑइल म्हणजेच १० ते ११ महिन्याच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर मिळणारे तेल. नारळाच्या खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा भिन्न असते.
हे तेल तयार करताना यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्वीक आम्लाचा स्तोत्र आहे.
हे तेल मानवाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नारळापासून तयार केलेले व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत बहुगुणी आणि बहुपयोगी तेल आहे.
नारळापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाला जगात 'सुपर फूड' म्हणून ओळख आहे. नारळापासून मिळणाऱ्या फॅटीअॅसिडचा उपयोग आरोग्याच्यादृष्टीने सकारात्मक आहे.
तेल लार्वीक आम्लाचा स्तोत्र असल्यामुळे ते रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जापेशीजाल निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते.
हे तेल आपल्या रक्तप्रवाहात शर्करा उत्पादित करत नसून त्याऐवजी रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील इन्शुलिन स्त्रवण्याच्या क्रियेस सुधारणा होते.
हे तेल त्वचेवर लावल्यास जिवाणू प्रतिबंध थर बनवून बाधित भागास संरक्षण कवच म्हणून काम करते. तसेच जखम भरून काढण्यास गती देते.