Aslam Abdul Shanedivan
नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. त्यामुळेच नारळाला "कल्पवृक्ष' म्हणतात.
या कल्पवृक्षाच्या विविध भागांवर प्रक्रिया केल्यावर खोबरे, डेसिकेटेड खोबरे, नारळ मलई, दूध, ऍक्टिव्हेटेड कार्बन अशी उत्पादने तयार करणाऱ्या लघु उद्योगाची उभारणी करता येणे शक्य आहे.
नारळाचा उपयोग हा प्रमुख्याने खोबरे तयार करण्यासाठी केला जातो. ताज्या खोबऱ्यात 50 ते 55 टक्के तसेच वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते.
डेसिकेटेड कोकोनट हा मिठाई, इतर खाद्य कारखाने, चॉकलेट, कॅन्डीमध्ये याचा वापर केला जातो.
पक्व नारळाच्या खोबऱ्यापासून दूध तयार करतात. डेअरी क्रीमला पर्याय म्हणून या दुधाचा वापर होतो. नारळाच्या दुधापासून घट्ट मलई तयार केली जाते. वेगवेगळ्या करी, गोड पदार्थ, पुडिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो.
या पाण्यात साखर, प्रोटिन, स्निग्धांश आणि पालाश असे खनिजे असतात. "चौघाट ऑरेंज ड्वार्फ' ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे.
सुक्या खोबऱ्यापासून 65 ते 70 टक्के (सरासरी 60.5 टक्के) खोबरेल तेल मिळते. तर देशात अंदाजे 1.7 दशलक्ष टन करवंटी दर वर्षी उपलब्ध होते. यापासून कोळसा, ऍक्टिव्हेटेड कार्बन, करवंटी भुकटी, भांडी, शोभेच्या वस्तू, आइस्क्रीम कप, बटण अशी विविध उत्पादने तयार केली जातात.