Paddy Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy Procurement : रायगड जिल्ह्यात ३८ भात खरेदी केंद्रे सुरू

धान खरेदी योजनेंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारीतील ३८ केंद्रांवर भाताची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळणार आहे.

टीम ॲग्रोवन

अलिबाग : धान खरेदी योजनेंतर्गत (Paddy Procurement Scheme) मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारीतील ३८ केंद्रांवर भाताची विक्री (Paddy Sale) करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (Paddy MSP) मिळणार आहे. खरीप पणन हंगामाचा कालावधी तीन महिन्यांचा असून यामध्ये जास्तीत जास्त भाताची खरेदी (Paddy Procurement) करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, यासाठी शेतकऱ्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत.

यंदा सर्वसाधारण भातासाठी दोन हजार ४० रुपये प्रतिक्विंटल; तर ‘अ’ दर्जाच्या भातासाठी दोन हजार ६० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीच्या सात-बारा उताऱ्याची छायांकित प्रत आवश्यक आहे.

धानाची खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने नोंदणी आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील, असे मार्केटिंग फेडरेशनकडून कळवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT