Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production: देशात ३३० लाख गाठी कापूस उत्पादनः कापूस ब्रोकर्स

Cotton Market Update : देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजावरून सध्या मोठे मत मतांतरे आहेत. सरकार आणि वेगवेगळ्या संघटनांच्या अंदाजात मोठी तफावत दिसते.

Team Agrowon

Cotton Market News: देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजावरून सध्या मोठे मत मतांतरे आहेत. सरकार आणि वेगवेगळ्या संघटनांच्या अंदाजात मोठी तफावत दिसते. आता नॅशनल काॅटन ब्रोकर्स असोसिएशनने देशात कापूस उत्पादन जवळपास ३३० लाख गाठींवर स्थिरावल्याचे म्हटले.

देशात कापूस उत्पादनाचा अचूक अंदाज काढण्याची ठोस पध्दती देशात नाही. त्यामुळे सरकार आणि कापूस, सूत आणि कापड उद्योगांच्या संस्थांचे अंदाज वेगवेगळे असतात. भारतात मुख्यतः शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर त्यापासून तयार झालेल्या गाठींवरून उत्पादन अंदाज बांधले जातात. नॅशनल काॅटन ब्रोकर्स असोसिएशन अर्थात एनसीबीएने जूनच्या अखेरपर्यंत बाजारात आलेल्या कापसावरून अंदाज जाहीर केला.

एनसीबीएच्या मते जूनच्या शेवटपर्यंत देशता जवळपास २९६ लाख गाठी कापूस बाजारात आला. मागील हंगामात याच काळातील कापूस आवक ३०० लाख गाठींची होती. तर मागील हंगामात देशातील कापूस उत्पादन ३१२ लाख गाठी झाले होते.

राजकोट येथील कापूस, सूत व्यापारी आनंद पोपट यांनी बिझनेस लाईनला दिलेल्या माहितीनुसार देशात जूनपर्यंत २९० लाख गाठी कापूस आल्याचा अंदाज आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी ३५ लाख गाठी कापूस बाजारात येऊ शकतो. पण एनसीबीएने २९६ लाख गाठी कापूस बाजारात आल्याचे म्हटले आहे.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र यंदा देशातील कापूस उत्पादन २९८ लाख गाठींवर स्थिराल्याचा अंदाज जाहीर केला. पण या अंदाजावर अनेक व्यापारी आणि उद्योगांनी असहमती दर्शवली. सीएआयच्या अंदाजापेक्षा एनसीबीएचा अंदाज जास्त आहे. तर कापूस उत्पादन आणि वापर समिती म्हणजेच सीसीपीसीच्या मते यंदा देशातील उत्पादन ३४३ लाख गाठींवर पोचले. सीसीपीसीचा अंदाज सर्वात जास्त आहे.

यंदा देशातील कापूस उत्पादनाचे चित्र सुरुवातीपासू अस्पष्ट राहीले. विविध संस्थांचे अंदाज २९८ लाख गाठींपासून ते ३६० लाख गाठींपर्यंत आहेत. यंदा शेतकऱ्यांनी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने केली.

म्हणजेच एकदम कापूस विकला नाही. यामुळे कापूस उत्पादनाचा अंदाज बांधता आला नाही. गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला होता. यंदाही कापसाचे भाव या पातळीवर पोचतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता. त्यामुळे सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये कापसाची विक्री कमी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT