Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मलकापूर बाजार समितीत मका २०७० रुपये क्विंटल

Maize Rate : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होत असलेल्या मक्याला कमाल २१०० रुपयांचा दर मिळाला तर सरासरी दर २०७० रुपये राहिला.

 गोपाल हागे

Buldana News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होत असलेल्या मक्याला कमाल २१०० रुपयांचा दर मिळाला तर सरासरी दर २०७० रुपये राहिला. विदर्भात मलकापूर बाजार समिती मक्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध मानली जाते.

या ठिकाणावरून हंगामात हजारो क्विंटल मक्याची खरेदी-विक्री होत असते. नवीन हंगामातील मका विक्रीला येणे अद्याप सुरू झालेले नाही. या बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) सुमारे ४६८ क्विंटल मक्याची आवक झाली.

यापैकी २८ क्विंटल मका २१०० रुपये तर ४० क्विंटल मका १७०५ रुपये दराने विकला गेला. सरासरी २०७० रुपये दराने ४०० क्विंटल मक्याची विक्री झाली.

हरभऱ्याच्या आवकेत वाढ

सध्या या बाजारात हरभऱ्याची तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक सुरू आहे. या ठिकाणी हरभरा सरासरी ५२०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. कमाल दर ५४९० तर किमान दर ४८५० रुपयांपर्यंत आहे.

तुरीचीही दीड हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक आहे. तुरीला येथे कमाल १० हजार ५५० आणि किमान ९ हजार १२५ रुपये दर मिळाला. सर्वाधिक माल सरासरी ९७०० रुपये दराने विक्री झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT