नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्ताला खरीप लाल कांद्याची आवक (Onion Rate) सुरू होते; मात्र चालू वर्षी कांदा रोपवाटिकांचे नुकसान (Onion Nursery), अतिवृष्टी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे (Onion Disease) हंगाम लांबणीवर गेला आहे. उत्पादन घटण्यासह उत्पादनावर परिणाम झाल्याची स्थिती आहे. अद्याप बाजार समितीमध्ये आवक कमीच आहे.
अशातच जिल्ह्यांत दरात सुधारणा झाली आहे. शुक्रवारी (ता. २५) उमराणे बाजार आवारात क्विंटलला किमान २,००० ते कमाल ७,१७१, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाला. कमी असलेली आवक व कांदा बीजोत्पादनासाठी अमागणी असल्याने दर मिळत असल्याचे बोलले जात आहे.
खरीप कांदा उत्पादनात देवळा, चांदवड हे तालुके नेहमी आघाडीवर असतात. त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर उमराणे, मुंगसे या बाजार आवारात आवक होऊन लिलाव होत असतात. दसऱ्याला उमराणे येथील श्री रामेश्वर कृषी बाजार आवारात मुहूर्ताचा दर ११,१११ रुपये मिळाला होता. येथे १०० क्विंटल आवक होऊन किमान १,६०१ ते कमाल ५,१५१, तर सरासरी ३,००० दराने लिलाव पार पडले.
आता पिंपळगाव, चांदवड बाजार आवारात चालू सप्ताहात आवक सुरू झाली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार आवारात शुक्रवारी प्रतिक्विंटलला ६,२०० रुपये कमाल दर मिळाला. किमान दर २,३२५, तर सरासरी दर ३,०१० रुपये राहिला. गुरुवारी (ता. २४) पिंपळगाव बसवंत येथे कमाल ५,९०० रुपये, तर चांदवड बाजार समितीत ५,१०० दर मिळाला होता.
दरात वाढ नावालाच; आवकेत मोठी घट
चालू वर्षी जिल्ह्यात २७,६०९ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली. मागील वर्षीच्या तुलनेत लागवडीत १,७२९ हेक्टरने घट झाली आहे; मात्र लागवडी उशिराने झाल्याने उमराणे, मुंगसे (मालेगाव) येथे आवक सुरू झाली होती. तर चालू सप्ताहात चांदवड व पिंपळगाव बसवंत येथे आवक सुरू झाली. शुक्रवारी (ता. २५) पिंपळगाव बसवंत येथे क्विंटलमागे ३०० वाढ झाली, तर चांदवड येथे २००० रुपयांनी घसरण झाली. लासलगाव, येवला, नांदगाव, कळवण, सटाणा, नामपूर येथे आवक सुरू झालेली नाही.
बाजार समितीमधील दर स्थिती
(ता. २४)
बाजार समिती किमान कमाल सरासरी
(दर रुपयांत)
पिंपळगाव बसवंत १२०० ५९०० ३०००
चांदवड २००४ ५१०० ३०००
उमराणे २००० ६६०० ३९००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.