Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : निर्यातीच्या केळीला १४०० रुपयांचा दर

Banana Market : खानदेशातून आखातात केळी निर्यातीची गती कायम आहे. सध्या रोज सहा कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातून आखातात केळी निर्यातीची गती कायम आहे. सध्या रोज सहा कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. निर्यातीच्या केळीदरात किंचित सुधारणा झाली असून, दर १४०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

केळी निर्यातीच्या कार्यवाहीसाठी काही बड्या कंपन्या खानदेशात खरेदी करीत आहेत. या कंपन्यांनी कुशल मजूर केळी पॅकिंग, काढणीच्या कार्यवाहीसाठी उपलब्ध केले आहेत. यंदा आखातात केळी पाठवणुकीसंबंधीदेखील अडचणी होत्या. निर्यात मध्यंतरी रखडत सुरू होती. परंतु निर्यात वाढली आहे.

कारण, निर्यातीसाठी सतत केळीचा पुरवठा झाला. तसेच निर्यातदारांनीदेखील निर्यातीची गती कायम राखली. यंदा मार्च ते जून या कालावधीत खानदेशातून सुमारे १५ कंटेनर केळी आखातात निर्यात झाल्याची माहिती आहे. त्याची सुरवात मार्चमध्ये झाली होती.

सध्या रोज सहा कंटेनर केळीची निर्यात होत आहे. यात एक कंटेनर रोज शहादा तालुक्यातून एका कंपनीच्या मदतीने आखातात पाठविले जात आहे. तर जळगाव जिल्ह्यातून रोज पाच कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे. सावदा (ता. रावेर), अंतुर्ली, (ता. मुक्ताईनगर) येथील केळी निर्यात सुविधा केंद्रांतून केळीची पाठवणूक सुरू आहे. कमाल केळी निर्यातदार कंपन्या थेट शेतात केळी पॅकिंग व इतर कार्यवाही करीत आहेत.

उत्तर भारतातून उठाव

निर्यातीच्या केळीला मध्यंतरी ११०० ते १२०० रुपये रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. परंतु आता दरात सुधारणा झाली आहे. मुक्ताईनगर, चोपडा, यावल, रावेरात अधिकची निर्यातक्षम केळी येत आहे. सुमारे चार केळी खरेदीदार कंपन्या खानदेशात केळी खरेदी करीत आहेत. यामुळे दरावरील दबाव फारसा वाढलेला नाही. सध्या आंध्र प्रदेशातही केळी उपलब्ध नाही. यामुळे दिल्ली, पंजाब, काश्मीर आदी भागांतूनही खानदेशातील केळीला उठाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT