Cashew Crop Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : काजू बीला प्रतिकिलो १०० रुपये दर

Cashew Rate : काजू बी च्या दरात दर आठवड्याला घसरण होताना दिसत आहे. प्रतिकिलो १३० वर असणऱ्या दरात आता १०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : काजू बी च्या दरात दर (Cashew Rate) आठवड्याला घसरण होताना दिसत आहे. प्रतिकिलो १३० वर असणऱ्या दरात आता १०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये (Cashew Farmer) नाराजी दिसून येत आहे.

जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड आहे. त्यातील ५९ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. आंब्याप्रमाणे हजारो कुटुंबांचे प्रमुख पीक काजू बनले आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी काजूचा दर प्रतिकिलोला १९० ते २०० रुपयांवर गेला होता. त्यात काजू बी नाशवंत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काजू लागवड केली.

परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत बदलते वातावरण, कोरोनाचे संकट आणि आता काजूचे घसरलेले दर यामुळे काजू पीक नकोसे झाले आहे. यावर्षी हंगाम सुरू झाला तेव्हा काजू बी ला प्रतिकिलो १२० रुपये दर होता. त्यात सुधारणा होऊन तो १३० रुपयांपर्यंत गेला.

परंतु काजू बीची आवक वाढताच काजू बीच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. दर आठवड्याला प्रतिकिलो पाच ते दहा रुपयांनी काजू बीच्या दरात घसरण झाली. आता दर १०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

कोकणातील शेतकऱ्यांनी भात पीक उत्पादन कमी करून काजू लागवडीवर भर दिला होता. जेणेकरून त्यातून आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. परंतु काजू बीला हमीभाव नसल्यामुळे काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

आता तर काजू बीचा दर १०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे आता तरी शासनाने काजू उत्पादकांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

- संदेश देसाई, काजू उत्पादक शेतकरी, दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT