पाणी उकळणे हा पाणी शुद्धीकरणाचा एक खात्रीशीर उपाय आहे. 
महिला

पाणी शुद्धीकरणासाठी प्रक्रिया

डॉ. क्षितिजा कुलकर्णी

पिण्याचे स्वच्छ पाणी ज्या गतीने कमी होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणेदेखील कठीण होईल. यावर पाणी शुद्धीकरण हा एकमेव उपाय अाहे. पाण्याच्या दूषित संसर्गाने, कमतरतेमुळे, क्षारांच्या प्रमाणामुळे, त्यामध्ये विरघळणाऱ्या वायूंमुळे, त्याच्या साठवण्याच्या पद्धतीमुळे किंवा वितरणाच्या पद्धतीमुळे अनेक आजार संभवतात. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीची माहिती असने अावश्‍यक अाहे. गाळणे पाण्यात न विरघळणारे पदार्थ असतील, माती वा गढूळपणा असेल तर पाणी गाळून घ्यावे लागते. पाणी उकळणे हा एक खात्रीशीर उपाय आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर किमान १० मिनिटे उकळावे. उकळलेले पाणी थंड करत असताना त्यात तुरटी फिरवावी. यामुळे  जिवाणू-विषाणू तर नष्ट होतातच पण  क्षारांचे प्रमाणसुद्धा कमी होते. त्यामुळे मुतखड्यासारखे आजारही कमी होतात. पण काही विषारी घटक मात्र कमी होत नाहीत. पाणी उकळल्याने त्याची चव बदलते व ते बऱ्याच जणांना आवडत नाही. हे त्यातील विरघळलेले वायू निघून गेल्यामुळे होते. पण काही काळ पाणी झाकून तसेच ठेवल्यास त्याची चव ठीक होते. क्लोरिनेशन पाण्यामध्ये क्लोरिन मिसळणे. याकरिता सोडियम हायपोक्लोरायीट (५ टक्के द्राव्य) हे औषध वापरतात. हे औषध एक वर्षाच्या आतील असावे, त्यापेक्षा जुने नको. ५ ते १० मिलि सोडियम हायपोक्लोरायीट २० लिटर पाणी स्वच्छ करते. यापेक्षा जास्त औषध टाकल्यास पाण्याला कडूपणा येतो. क्लोरिनच्या शुद्धीकरणाने बहुतेक सर्व जिवाणू व विषाणू मरतात. ओझोनेशन हे काही युरोपीय देशांमध्ये वापरतात. क्लोरीनेशनपेक्षा अधिक जिवाणू मारण्याची क्षमता असूनही महाग असल्यामुळे फार लोकप्रिय प्रकार नाही. आणि घरगुती वापरासाठी उपलब्धही नाही. क्लोरामिनेशन यामध्ये क्लोरिनबरोबर अमोनियाचा सुद्धा वापर केला जातो. याचा परिणाम जास्त काळ राहतो. ब्रोमिन/आयोडिन   सहलीमध्ये वगैरे तत्काळ पाणी शुद्ध करायचे असल्यास वापरू शकतो. घरगुती फिल्टर्स    अतिनील किरण, रिझर्व्ह, अाॅस्मॉसिस, अल्ट्राफीलट्रेट असे विविध तंत्रज्ञान वापरून बनवलेले फिल्टर्स आता मिळतात. अतिनील किरणांनी सूक्ष्मजीव नष्ट होतात. पण क्षारांचे व विषारी पदार्थांचे प्रमाण बदलत नाही व पाण्याची चवदेखील बदलत नाही. त्याकरिता रिझर्व्ह, अाॅस्मॉसिस अल्ट्राफीलट्रेट ( RO व RF) हे तंत्रज्ञान लागते. जर आपल्या पाण्याची चव चांगली असेल व विषारी पदार्थ व क्षार यांचे प्रमाण कमी असेल तर फक्त यूव्ही फिल्टर वापरला तरी चालेल. त्याला फार खर्च येत नाही. RO व RF फिल्टर्सना पुढे ठराविक वापरानंतर फिल्टर्स बदलावे लागतात. हे थोडे खर्चिक व ग्रामीण भागामध्ये सेवा मिळवण्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. व पाणीसुद्धा जास्त वाया जाते. विजेची अडचण असेल तर वीज न लागणारे साधे फिल्टर्स सुद्धा मिळतात. (लेखिका दौंड, जि. पुणे येथे आयसीयू तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT