Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये
Sanjay Gandhi and Shravana Bal Scheme: राज्य सरकारने गरजू आणि दुर्बल घटकांसाठी आज बुधवारी (ता.३) मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.