Pomegranate Orchard Planning Agrowon
कृषी सल्ला

Pomegranate Orchard Planning : सांगोल्यातील सदाशिव चौगुले यांनी १४ एकर डाळींब बागेचं केलंय योग्य नियोजन

Pomegranate Orchard : सोलापूर जिल्ह्यातील जुजारपूर (ता. सांगोला) येथे सदाशिव मनोहर चौगुले यांची १४ एकर शेती असून, त्यात सर्व क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे.

Team Agrowon

शेतकरी : सदाशिव मनोहर चौगुले

गाव : जुजारपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : १४ एकर

डाळिंब क्षेत्र : १४ एकर

Pomegranate Orchard Update : सोलापूर जिल्ह्यातील जुजारपूर (ता. सांगोला) येथे सदाशिव मनोहर चौगुले यांची १४ एकर शेती असून, त्यात सर्व क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे. त्यामध्ये २०१६ मध्ये १० एकरमध्ये लागवड केलेले भगवा वाण आहे.

तर उर्वरित ४ एकरांमध्ये वर्षभरापूर्वी एक स्टंप पद्धतीने (एक खोड) लागवड केली आहे. जुन्या बागेतील लागवड ही नऊ फूट बाय १३ फूट अंतरावर आहे. त्यात दोन ठिबक नळ्या टाकल्या होत्या.

मात्र या दोन ठिबक नळ्यांमुळे सातत्याने आर्द्रता राहून तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचा त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी चार लिटरचा एकच ड्रीपर करून घेतला. त्यामुळे तेलकट रोग आणि मर रोगाला प्रतिबंध झाल्याचा त्यांचा दावा आहे.

नव्या बागेत एक स्टंप पद्धतीने केलेल्या लागवडीमध्येही नऊ फूट बाय १३ फूट असेच अंतर ठेवले आहे. या बागेतही दोन झाडांच्या मध्ये चार लिटरचा एकच ड्रीपर बसवला आहे. या बागेतही विविध किडी आणि रोगाला अटकाव झाला आहे.

मुळात एक स्टंप पद्धतीमुळे पेस्ट लावण्यासाठी खर्च कमी येतो. तसेच प्रत्येक फवारणीचे कव्हरेजही चांगले मिळते. त्यामुळे या दोन्हीही बागांची स्थिती चांगली आहे. सध्या जुन्या दहा एकरावरील बागेत आठवडाभरापूर्वीच मृग बहर धरला आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

- दरवर्षी साधारण मृग बहरच धरतो.

- कीड रोग नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीडनाशकांचा वापर करताना झाडांची मुळे चांगल्या प्रकारे कार्यरत असली पाहिजेत. त्यासाठी शेणखताची स्लरी आणि ईएम द्रावणाची ड्रेचिंग केली जाते.

- मृग बहर धरत असल्याने बाग ताणावर असताना, काडीमध्ये अन्नद्रव्यांची साठवण होण्यासाठी या कालावधीत एकरी एक लिटर या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये देतो.

- त्यानंतरही महिन्यातून दोन वेळा ही अन्नद्रव्ये देतो.

- मृग बहराआधी दोन महिने अन्नद्रव्यांची साठवण करण्यालाच प्राधान्य असते. बाग सामान्यतः दोन महिने ताणावर सोडली जाते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या चांगली पानगळ (सुमारे ५० टक्क्यांपर्यंत) होते.

मागील दहा दिवसांतील कामे

- गेले दोन महिने बाग ताणावरच होती, आठवड्यापूर्वी मृग बहर धरला आहे.

- बहर धरल्याने शेणखत आणि बेसल डोस टाकून घेतला आहे.

- मागील काही दिवसांतील पावसाळी वातावरणामुळे बुरशीनाशकाची फवारणी घेतली.

- तेलकट डाग रोगाच्या प्रतिबंधासाठी चार दिवसांच्या अंतराने बोर्डो मिश्रण एक टक्का या प्रमाणे फवारणी घेतली.

- मर रोग आणि पीन होल बोरर या किडीसाठी शिफारशीप्रमाणे एक फवारणी घेतली.

- साधारपणे दहा दिवसआधी बागेमध्ये चार तास पाणी सोडून चांगला ओलावा करून घेतला. त्यानंतर सूत्रकृमींसाठी (निमॅटोड) ड्रीपमधून रासायनिक कीडनाशक सोडण्यात आले.

- बहर धरण्यासाठी आवश्यक तितकी पानगळ करून घेण्यासाठी रसायनाचा वापर केला.

- पानगळीनंतर एक टक्का बोर्डोची फवारणी करून घेतली.

पुढील वीस दिवसांत कामांचे नियोजन :

- ड्रीपमधून शिफारशीनुसार खते देणार आहे.

- सध्या वातावरणात सातत्याने बदलत आहे. त्यात वातावरण पाहून कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणी घेणार आहे.

- सूक्ष्म अन्नद्रव्याची एक फवारणी घेण्याचे नियोजन आहे.

संपर्क - सदाशिव चौगुले, ९९७५७५१००२, (शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT