vermicomposting Agrowon
कृषी सल्ला

मैल्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती

नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मैला प्रक्रिया गांडूळ खत प्रकल्प महिन्याला शंभर किलो गांडूळ खत बनणार.

टीम ॲग्रोवन 

रत्नागिरी : शौच्छालयातील मैल्यावर प्रक्रिया करून गांडूळ खतनिर्मितीचा (vermicomposting) महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत होत आहे. दिवसाला दहा हजार लिटर मैल्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यामधून महिन्याला शंभर किलो गांडूळ खत (Fertilizers) बनणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचे भूमिपूजन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant Education Minister) यांच्या हस्ते झाले. येत्या दोन महिन्यांत तो कार्यान्वित करण्यात येईल. मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प नाचणे (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीत केला जाईल. नाचणेसह शिरगाव, मिरजोळे, कुवारबाव, खेडशी या ग्रामपंचायत क्षेत्रातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. मैला गाळा व्यवस्थापन प्रकल्पासाठी १ कोटी २७ लाख ४१ हजार ८३९ रुपये लागतील. साडेतीनशे स्क्वेअरमीटर जागेमध्ये दिवसाला दहा हजार लिटर मैल्यावर प्रक्रिया करण्यात येईल.

महिन्याला १०० किलो खते तयार होतील. त्यातून बाहेर पडणाऱ्‍या पाण्यावर प्रक्रिया करून ते बाग-बगीच्यासह प्रकल्पासाठी वापरता येईल. टायगर बायोफिल्टर (एफएसटीपी) टेक्नॉलॉजीतर्फे नाचणेतील हा प्रकल्प उभारला जात आहे. येत्या दोन महिन्यांत तो कार्यान्वित होईल.
या बाबत प्रकल्प प्रतिनिधी रोहित पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाला सहा घरांच्या शौचालयातील मैला टँकरने गोळा करून प्रकल्पाच्या टाकीत आणला जाईल. साठवण टाकीमधून तो प्रक्रियेसाठी दुसऱ्या टँकमध्ये सोडला जाईल. तेथे बॅक्टेरिया टाकून अनावश्यक घटक मारले जातात. उरलेला पाणीमिश्रित मैला पुढील टँकमध्ये आणून त्याचे गांडूळ खत (vermicomposting )बनविण्यात येते. या प्रक्रियेसाठी साधारणपणे चोवीस तास लागतात. शेवटच्या टँकमध्ये गांडुळे ठेवलेली असतात, त्यातून खत तयार होते. दहा हजार लिटरमधून शंभर किलो गांडूळ खत निर्माण होते.

नाचणे (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीमध्येच गोर्बधन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व गॅसनिर्मिती केली जाईल. दिवसाला २ हजार किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून प्रतिदिन ८० युनिट्स वीजनिर्मिती केली जाईल. यासाठी ७९ लाख ६५ हजार ६९१ खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून ५० लाखांची तरतूद आहे. उर्वरित २९ लाख रुपये ग्रामपंचायतीतर्फे दिले जातील.

ग्रामपंचायत :कुटुंबे
नाचणे : २५७५
शिरगाव : ३४६४
मिरजोळे : २३८३
कुवारबाव : ३०५३
खेडशी : ८८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT